Payal Books
Bhatacha por भटाचा पोर डॉ. विश्वास मेहेंदळे
Couldn't load pickup availability
आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून मराठी वृत्तनिवेदक या नात्यानं परिचय. 'आकाशवाणी ! विश्वास मेहेंदळे आपल्याला बातम्या देत आहे.' हा दिल्ली केंद्रावरून येणारा बुलंद आवाज १९६६ ते १९७२ अशी ७-८ वर्षे महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या परिचयाचा आहे. दूरदर्शन मधील एक ज्येष्ठ, जाणकार कलावंत, अधिकारी म्हणून २० वर्षांपेक्षा अधिक काळ. अनेक कार्यक्रम केले. लो. टिळकांचे अग्रलेख या विषयात मुंबई विद्यापिठाची पीएच्. डी. पदवी प्राप्त केली.
एक ज्येष्ठ प्रसारमाध्यम तज्ज्ञ, राज्याचे माजी सांस्कृतिक संचालक, दै. तरुण भारत पुणे व दै. एैक्य सातारा यांचे माजी संपादक. पुण्यातील सिंबॉयसिस वृत्तविद्या प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून १९९०-१९९८ या काळात संचालक. दूरदर्शनवरील 'वादसंवाद' हा कार्यक्रम लोकप्रिय केला. पुणे विद्यापिठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्राचे माजी संचालक.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
