Skip to product information
1 of 2

Payal Books

Sant Tukaram संत तुकाराम व्यक्ती व वाङ्मय - प्रा. डॉ. शोभा गायकवाड

Regular price Rs. 324.00
Regular price Rs. 360.00 Sale price Rs. 324.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

जगद्गुरु " श्री संत तुकाराम" यांच्या जीवनावर अनेकांनी लिहिलेले आहे. प्रत्येक अभ्यासकाला श्रीतुकारामांच्या व्यक्तिमत्वास आणि वाङ्मयास दर वेळेस नवीनच गवसलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात वारकरी संप्रदायाशी संबंधित या सकस, धारधार आणि प्रवासी साहित्य प्रवाहाने मराठी वाङ्मयात मोलाची भर टाकलेली आहे.

 

या ग्रंथात लेखिकेने संत तुकाराम एक व्यक्ती व साहित्यिक म्हणून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत वाङ्मय हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिकपणाची गुरुकिल्लीच आहे.

 

संत तुकारामांच्या रसाळ वाणीत वत्सलता, विस्मय, अनुनय, प्रेम, क्रोध, तळमळ, परखडपणा, हळुवारपणा, शिवराळपणा आणि प्रसन्नता आहे. क्रांतिकारी, वैज्ञानिक दृष्टी असलेला, निःस्पृह जीवन जगणाऱ्या सत्यानुचरणी, शुध्दाचरणी अशा अलौकिक व्यक्तिमत्वाचा ठसा आपल्या साहित्यातून उमटविणाऱ्या संताचे हे संशोधन वाचकांना नक्कीच भावेल