Payal Books
Hasyakalol हास्यकल्लोळ- वसंत जोशी
Couldn't load pickup availability
या पुस्तकात निरनिराळ्या प्रसिद्ध लेखकांच्या, कवींच्या, नटांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न लेखक वसंत जोशी यांनी केला आहे. वाचकास अशा खाजगी गोष्टींमध्ये रुची असते. लता मंगेशकरांनी लग्न का केलं नाही,
दिलीपकुमार आणि मधुबाला यांचे का बिनसले,
व्ही. शांताराम आणि जयश्रीबाई यांच्यात काय वाद होता;
मोठेमोठे पुढारी स्विस बँकेत पैसे कसे जमा करतात वगैरे वगैरे.... वसंत जोशींनी अशा प्रसिद्ध व्यक्तींवर पान-पान किस्से लिहिले आहेत. हे किस्से वाचल्यानंतर वाचकांची करमणूक होते. काही किस्से प्रख्यात व्यक्तिंना चटके देणारेही आहेत आणि
काही त्यांच्या न्यूनावर बोट ठेवणारेही आहेत. तरीही या लेखनाचा उद्देश कुणा मोठ्या व्यक्तीची व्यंगं उघड करण्याचा नसून त्यांच्या खऱ्या गुणांची पारख आम जनतेला व्हावी हा आहे
