Payal Books
Nobal shalakaविज्ञानातील नोबेल शलाका - डॉ. तेजस्विनी देसाई
Couldn't load pickup availability
विज्ञानातील नोबेल शलाका
डॉ. तेजस्विनी देसाईआपल्या अंतर्मनातील प्रकाशाने उजळणाऱ्या या स्वयंप्रकाशीत तारका! केवळ पुरुषी मानसिकतेशीच नाही तर, आर्थिक, धर्म, वर्ण या सर्वच आघाडयांवर त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागला. या संघर्षातून तावून सुलाखून निघाल्यानंतरच त्यांना नोबेल पुरस्काराची झळाळी प्राप्त झाली. पण, नोबेल पुरस्कार हा त्यांच्या ध्येयवेड्या प्रवासातील केवळ एक टप्पा. त्यांना शोध घ्यायचा होता निसर्गाच्या कारामतींचा आणि आस होती मानवाच्या कल्याणाची. नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यकीय शाख, शांतता, साहित्य आणि अर्थशास्त्र या सहा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान! सन १९०१ ते २०२१ या कालावधीत ८८९ पुरुष, ५८ महिला आणि २८ संस्थांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. शास्त्र शाखेमध्ये गौरवण्यात आलेल्या ६२९ विजेत्यांमध्ये महिलांची संख्या केवळ २३. (मेरी क्युरीला दोनवेळा पुरस्कार मिळाला.) जगातील सर्वोच समजल्या जाणाऱ्या पुरस्कारावर मोहोर उमटवणाऱ्या महिलांची संख्या इतकी कमी का? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखिकेने असोशीने या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकातून या विदुषच्या जीवनसंघर्षाचा रोचक पट उलगड जातो आणि समोर येतात त्या जिद्द, कठोर परिश्रम आणि बुद्धीवैभावाच्या जोरावर अखंडतळपणाऱ्या तेजस्वी तारका!
