Payal Books
Avlokan अवलोकन - श्रीपाद भालचंद्र जोशी
Couldn't load pickup availability
श्रीपाद भालचंद्र जोशी हे बहुआयामी, कृतिशील व्यक्तिमत्त्व आहे. ते कोणत्याच एका मापाने मोजता येत नाही... सामाजिकता, राजकीयता, सांस्कृतिकता, कलात्मकता, वाङ्मयीन अभिव्यक्ती
यांचे सामग्र्याने चिंतन करत, त्यांचे थर व पापुद्रे उलगडणारे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे मुख्यतः 'मराठी कवितेला वेगळे वळण आणि परिणामकारक बळ' देणारे कवी मानले जातात. हा कवी तत्त्वज्ञ कवी आहे. लेखक कार्यकर्ता आहे, विचारवंत आहे. त्यांची व्यापक व समग्र जीवनदृष्टी कवितेच्या कक्षा व मर्यादा आलांडून जीवनाच्या अशा अनेक घाटातून, माध्यमांमधूनही कृतिशीलरित्या व्यक्त होते.... त्यांचे व्यक्तिमत्त्व, लेखन, विचार, विचारदृष्टी व कार्यशैली समजावून घेऊन भाषा, साहित्य, संस्कृती, समाजपरिवर्तनविषयक, संस्थात्मक व आंदोलनात्मक कार्याची कृती योजना ठरवली पाहिजे. ही दृष्टी फार व्यापक व अपवादात्मक आहे. भाषाकारण, साहित्यकारण, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, वर्चस्वभाव, यातल्या बाबींकडे संलग्न व समग्र प्रक्रियेच्या अंगाने बघणारी ही दृष्टी आहे.
('यथार्थ' या डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी गौरवग्रंथाचे संपादक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या संपादकीयमधून )
'अवलोकन' मधील त्यांचे लेखन त्यांच्या या व्यक्तिमत्वाची साक्ष देणारे, अशाच विविध संबंधित विषयांवरच्या लेखांमधून विखुरलेले दिशादर्शक लेखन व भाष्य आहे. ते ते विषय, त्या त्या विषयांचे त्या त्या काळाचे संदर्भ व आयाम त्यातून तपासता येतात, समजून घेता येतात.
