Skip to product information
1 of 2

Payal Books

Thod sadale chandane थोडे सांडले चांदणे --जयश्री र. कुलकर्णी

Regular price Rs. 248.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 248.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

एका निवांत क्षणी, ओहोटीला लागलेला समुद्र स्वत:ला आतल्या आत रोखून धरताना दिसतो. मग अपरिहार्यपणे त्याला उधाणही येतं; त्यावेळी त्याच्या उजस्त्र शक्तिशाली लाटा किनाऱ्यावरच्या खडकावर आदळून अधिच उंच उसळतात. तसंच काहीसं कालानुरूप बदलत गेलेलं आजच्या स्त्रीचं रूप आहे.

 

खाली मान घालून आयुष्यभर सोशिकपणे जगत राहणारी स्त्री आज क्वचितच आढळते. तिच्या स्वयंभू ऊर्जेचा आणि कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या या कथा तिचं वेगळेपण समर्थपणे साकार करतात.

 

पुत्रशोकाने विव्हल होऊन कृष्णाला निर्भिडपणे जाब विचारणारी हिडिंबा किंवा नेहमीच समजूतदारपणे वागणारी पण नवरेशाहीचा अतिरेक सडेतोडपणे नाकारणारी श्वेता आपल्याला मनापासून भावतात. अमेरिकेहून भारतात येऊल इथल्या मातीशी नाळ जोडणारी क्रिस्टीन आणि पाश्चात्य संस्कृतीत वाढलेल्या नातवंडांची प्रगल्भता पाहून स्तिमित झालेली भारतीय आजी यांच्या कथा आपल्याला वेगळ्याच स्त्री वृत्तीचं दर्शन घडवतात; संवेदनशील मनाला अंतर्मुख करतात. हेच या कथांचं अनोखेपण म्हणता येईल.