Payal Books
Kiarr.. किर्रर्रर्र... जयश्री र.कुलकर्णी
Couldn't load pickup availability
या पुस्तकातल्या सर्वच कथांना आपण 'गूढकथा' म्हणत असलो तरी यातली प्रत्येक कथा केवळ गूढतेपेक्षा इतर अनेकविध अनुभव देते. या कथानकांच्या परिणामानुसार त्यांना विस्मयकथा, अद् भुतकथा, संदेहकथा, भयकथा अशी वेगवेगळी विशेषणे द्यावी लागतील. मात्र आश्चर्य आणि अनपेक्षितता हे समान सूत्र या सर्व कथांतून प्रकर्षाने जाणवते.
आफ्रिकेतल्या मसाईमाराच्या जंगलातून, स्कॉटलंडच्या घनदाट अरण्यातल्या प्राचीन गढीतून किंवा आपल्याकडच्या अगदी गावकुसाबाहेरच्या पायवाटेवरून जातानाही आपण आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारूनच एकेक शब्द ..... एकेक रोमांचकारी घटना पाहात, अनुभवतच पुढे सरकतो.
कथा वाचताना त्या त्या व्यक्तिंच्या समस्या, ताण आणि मनाची तगमग आपल्याही नकळत आपण स्वतःवर ओढवून घेतो. ही उत्कंठा हा एका अकल्पित वातावरणात घेऊन जाणारा साक्षात्कार हाच या कथांचा विशेष आहे.
