Payal Books
Hasyarang वारी जनातली, जनांच्या मनातली
Couldn't load pickup availability
या सांगून सवरून बिनबियांच्या गोष्टी आहेत. म्हणजेच यात बी नाही तरीही त्या वाढल्या, तरारल्या आहेत. बी म्हणजे सत्य लेखकाने इथे ज्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील घटनांना सत्याचा आधार नाही. गोष्टीला सत्याचा. प्रत्येक क्षणातील घटितांचा आधार नाही. पण ज्यांच्या बाबतीत या गोष्टी घडल्याचे लेखकाने दाखविले आहे त्या व्यक्ती मात्र खऱ्याखुऱ्या. प्रत्यक्षातल्या आहेत। खऱ्याखुऱ्या माणसांच्या खोट्या गोष्टी ।
पण त्या कशा, खऱ्याच वाटतील अशा । ज्यांच्याबद्दल वसंतरावांनी या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत, ती सगळी माणसं मराठी माणसांच्या अतिशय आदराची आणि आवडीची आहेत. जनमानसात आदराचे स्थान प्राप्त झालेल्या खऱ्या माणसांबद्दल कलात्मक गोष्टी लिहिण्याचा हा प्रकार लेखकाच्या अंगास येण्याचा धोका होता. पण तसे घडले नाही. याचे कारण- या सर्व माणसांबद्दल लेखक वसंत जोशी यांच्या मनात कमालीचा आदर, कौतुक आणि प्रेम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींबद्दल या गोष्टी लेखकाने रचल्या आहेत, त्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे लेखकाला पूर्णपणे ज्ञात आहे. विशिष्ट प्रसंगात (अर्थात, काल्पनिक प्रसंगात) विशिष्ट व्यक्ती कशी वागेल याची अटकळ लेखकाने बांधली ती त्या त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे आहे याचे पूर्ण आकलन लेखकाला असल्यामुळेच
