Payal Books
वारी जनातली, जनांच्या मनातली
Couldn't load pickup availability
दूरदर्शन, सिनेमा व इतर समाज माध्यमांतून दिसणारी 'वारी' आणि प्रत्यक्ष अनुभुती घेतल्यानंतर दिसणारी 'वारी' यात जमीन- आसमानाचे अंतर आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचे कौतुक करणारे प्रिन्स चार्ल्स पंढरीच्या पालखी सोहळ्यात आले असते, तर त्यांनी हा सोहळा पाहून नक्कीच गौरवोद्गार काढले असते. 'वैष्णव चॅरिटेबल' व 'मेडीकल ट्रस्ट'च्या माध्यमातून आम्ही गेले सलग चोवीस वर्षे हा पालखी सोहळा मनःपूर्वक अंगिकाराला आहे. 'कोरोना'चा दोन वर्षांचा काळ सोडला, तर गेल्या चोवीस वर्षांत आम्हाला दिसलेली 'वारी' लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. आपल्या अनेक गुण वैशिष्ट्यांनी ही 'वारी' अद्भुत आहे. अठरा पगड जाती- धर्माचे लोक कोणत्याही आमंत्रणाशिवाय एकत्र येतात. अठरा-वीस दिवस लाखोंचा जनसमुदाय कोणताही अनुचित प्रकार न घडता पंढरीला पोहोचतो हे फारच आश्चर्यकारक आहे. जन्माला येऊन प्रत्येकाने एकदा तरी ही 'वारी' अनुभवायला हवी.
