Payal Books
Rang resha vyaangresha रंगरेषा व्यंगरेषा - मंगेश तेंडुलकर शब्दांकन : स्वाती प्रभुमिराशी
Couldn't load pickup availability
मंगेश तेंडुलकर
व्यंगचित्रकार, नाट्यसमीक्षक, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि समाजव्रती कार्यकर्ताही !
व्यंगचित्रांना शब्दविरहित भाषा म्हणून 'साहित्यिक' वळण देणारा हा मनस्वी कलाकार आयुष्यभराच्या संघर्षयात्रेचाही प्रवासी आहे.
हा मुलगा जगणार नाही हे होतं ज्योतिष्याचं भाकीत हा काहीच करू शकणार नाही- हे होतं शाळेचं प्रमाणपत्र ह्या व्रात्य मुलाचं कसं होईल- ही होती वडिलांची धास्ती आणि हा पोर वटवृक्षाच्या पारंब्यांसारखा पसरत जाईल- ही आईची अशक्य वाटावी अशी खात्री !
आयुष्यानं दिलेल्या नकारांचे होकार करणाऱ्या तेंडुलकरांच्या भावजीवनाची आणि कलाजीवनाची ही आहे, 'तेंडुलकरी' स्ट्रोक्समधून साकारलेली 'रंगरेषा व्यंगरेषा' ! ही जीवनकहाणी कधी हसवते, कधी अस्वस्थ करते, कधी अवाक् करते आणि अखेरीस अंतर्मुख करते
