Payal Books
Theatratlya talya shitya थेटरातील टाळ्या शिट्ट्या दिलीप ठाकूर
Couldn't load pickup availability
चित्रपट संस्कृतीत दिग्दर्शक/निर्माता/ गीतकार/संगीतकार/गायक / वादक कलाकार/तंत्रज्ञ/कामगार/स्टुडिओ/ प्रदर्शक/वितरक / थिएटर्स/मल्टीप्लेक्स / पूर्वप्रसिध्दी / समिक्षा याबरोबरच रसिकही महत्वाचे. चित्रपटाच्या यशापयशात त्यांची "भूमिका महत्वाची. यह पब्लिक है. सब जानती है.....असा हा मामला आहे आणि आपल्या 'चित्रपट प्रेक्षक संस्कृती चे रंगढंग बहुस्तरीय आवडलेला चित्रपट (बोली भाषेत पिक्चर) हे प्रेक्षक पडद्यावरच न ठेवता डोक्यात आणि डोक्यावर घेतात. टाळ्या शिट्ट्यांनी थिएटर गाजवतात आणि आपल्याला न आवडलेला चित्रपट ते फार काळ पडद्यावर राहू देत नाहीत. तो रिकाम्या खुर्च्यासमोर दाखवावा लागतो. या प्रवासात प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचण्याच्या पध्दतीत वाढ होत गेली. फर्स्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट अनेक फिल्मवाल्यांचे टेन्शन वाढवते. काही फिल्मवाले तर म्हणतात. प्रेक्षक हाच खरा समिक्षक, आणि ते चित्रपटाचे भवितव्य घडवतात तेव्हा हे योग्यही वाटते.
