Payal Books
Deadly Game विजय-देवधर -- डेडली गेम
Couldn't load pickup availability
मंदाकिनीनं एक दीर्घ निःश्वास सोडला. सुधाकर तिला म्हणाला, "आपल्या दोघांमध्ये एक करार ठरला होता... आठवतं या कराराप्रमाणे तुझ्या नवऱ्याचा विमा उतरवून नंतर मी त्याचा खून करायचा होता आणि मग नंतर आपण दोघं एकत्र येऊन त्या विम्याच्या रकमेचा उपभोग घेणार होता. अगदी ऐशारामात! पण आता माझा विचार बदललाय. तुझ्यावर आता माझा विश्वास नाही आणि म्हणून मला माझा अर्धा वाटा हवा! येत्या दोन-चार दिवसांत विम्याच्या रकमेचे एक लाख रुपये तुला चेकनं मिळणार आहेत. तेव्हा मला तुझ्याकडून पन्नास हजारांचा चेक हवाय! तो पण आताच्या आत्ता! तो घेऊन मी इथून निघून जाईन आणि पुन्हा आयुष्यात तुझं थोबाड बघणार नाही." किचनमध्ये दडलेला बबन आपलं संभाषण ऐकतोय याची मंदाकिनीला जाणीव होती. त्याच्या उपस्थितीमुळे धीर एकवटून ती म्हणाली.....
