Payal Books
Aadvatevarchi Bhatkanti आडवाटेवरची भटकंती ओंकार वर्तले
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राची सांस्कृतिक, भौगोलीक आणि ऐतिहासिक 'लाईफलाईन' म्हणजे सह्याद्री, सह्याद्री म्हणजे पुराणपुरुषच, सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचा आत्माच. सह्याद्रीशिवाय भटकंती अशक्यच. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाचाच अभिमान म्हणजे सह्याद्री, प्रत्येक ऋतुत अन् प्रत्येक भेटीत हा वेगळा दिसतो. अन् अनुभवाचे दानही आपल्या ओंजळीत टाकत असतो. धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत जगणाऱ्या आपल्यासारख्या फिरस्त्याला निखळ आनंदाचे चार क्षण जगायला शिकवतो. मनाला नवी उभारी देतो. याच्या कुशीत केलेल्या भटकंतीला अधिक समृद्ध करायचे असेल तर या सह्याद्रीत डोळे उघडे ठेवून फिरायला पाहिजे. अनवट... आडवाटेवर असणाऱ्या ठिकाणांकडे डोळसपणे पाहता आलं पाहिजे. हाच उद्देश ठेवून प्रस्तुत पुस्तकात अशाच 'ऑफबीट' ठिकाणांचा समावेश केला आहे. तुम्हाला ती निश्चितच आवडतील.
