Payal Books
Rajkarnatlya Khaas Chowghi राजकारणातल्या खास चौघी-रोहिणी गवाणकर
Couldn't load pickup availability
सदर पुस्तकाचे नाव 'राजकारणातील खास चौघी' असे जरी असले तरी, खरे पाहता ते चाळताना नव-निर्मित महाराष्ट्राचा अत्यंत तेजस्वी असा इतिहास डोळ्या पुढून अत्यंत झपाट्याने जातो! सदर पुस्तकाच्या लेखिका प्रा. डॉ. रोहिणी गवाणकर यांनी स्वातंत्र्योत्तर काळात, महाराष्ट्रातील अनेक प्रमुख सामाजिक आंदोलनात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या कॉ. अहिल्या रांगणेकर, कॉ. तारा रेड्डी, मृणाल गोरे आणि प्रमिला दंडवते ह्या चार 'खास' महिला कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून सदर पुस्तकाचे लेखन केले आहे. या चौघीजणी अतिशय निष्ठावान आणि आपल्या कार्याशी समर्पित वृत्तीने वागणाऱ्या होत्या. तत्त्वांवरची अढळ निष्ठा तसेच समाजाच्या सुखमय जीवनासाठी ह्या चौघींनी केलेला संघर्ष हा अवर्णनीय आहे. त्यांचे योगदान मनस्वी आहे यात तिळमात्र शंका नाही. त्यांचे जीवन नवीन पिढीसाठी निश्चितच प्रेरक ठरू शकेल.
