Payal Books
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
Couldn't load pickup availability
लोकमान्य टिळकांविषयी लिखाण करण्याची संधी म्हणजे माझ्या लेखी मला मिळालेला हा फार मोठा बहुमान आहे. त्याचबरोबर मला सविनय नमूद करावेसे वाटते की, लोकमान्यांवर लिहिणे ही एक जबाबदारीही आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या कित्येक वर्षांत अनेक भाषांमध्ये लोकमान्य टिळकांवर विपुल साहित्य लिहिले गेले. त्यापैकी काही साहित्य तर इतके लक्षवेधी आणि तपशीलवार आहे की, आपण आता त्यात दखल घेण्यासारखे तसेच लक्षणीय अशी भर घालण्याजोगे आणखी काय आणि कसे लिहू शकतो, अशी शंका वाटायला लागते. तरीही ही इतकी छान संधी मिळाल्यामुळे अभिमानास्पद वाटते.
ज्या थोर माणसांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला स्वातंत्र्य उपभोगण्याचे भाग्य लाभले आहे, त्यांतील एका लढवय्याचे चरित्र खोलात जाऊन उलगडण्याची फार मोठी संधी मला मिळाली याचे माझ्यावर दडपण आले आहे. लोकमान्य टिळकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढण्याचा पवित्रा घेतला आणि भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या संघर्षमय लढ्याचा पहिला घणाघाती फटका इंग्रजांना बसला. एखाद्या अत्यंत आवडलेल्या कथेसारख्याच या लक्ष्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा कितीही वेळा ऐकल्या, तरी आपल्याला त्या मंत्रमुग्धच करतात. आपले राष्ट्रगीत ऐकताना प्रत्येक वेळी आपला कर गवने भरून येतो. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांचे जीवन आणि कार्य समजून घेताना प्रत्येक वेळी आपली मान अभिमानाने उंचावते.
