Payal Books
Unhachya Kataviruddha - उन्हाच्या कटाविरुद्ध By Nagaraj manjule नागराज बाबुराव मंजुळे
Couldn't load pickup availability
Unhachya Kataviruddha - उन्हाच्या कटाविरुद्ध By Nagaraj manjule नागराज बाबुराव मंजुळे
'फँँड्री' नावाची कविता रुपेरी पडद्यावर चितारण्यापूर्वी नागराजने शुभ्र
कागदावर लिहिलेली आशयसंपृक्त कविता पृथ्वीला सुचणाऱ्या
झाडांइतकीच सहजजन्मा आहे. तिला मानवी दुःखाच्या नाडीचा
जन्मजात नाद आहे आणि तरीही तिच्यात या सनातन बाहेरख्याली
उन्हाच्या कटाविरुद्ध त्वेषाने फुलण्याचे सामर्थ्य आहे. ही कविता आत्मशोधाच्या वाटेने जाताना इथल्या धर्मसंस्कृती आणि
सौंदर्यशास्त्राच्या इमल्यांंनाच सुरुंग लावते. प्रत्येकाच्या हातात आपले
काळीज ठेवणारी ही कविता इथल्या चेहरा हरवलेल्या गर्दीला आपल्या
स्पंदनांची विराणी ऐकवता ऐकवता माणूसपण बहाल करणारी आहे.


