Skip to product information
1 of 2

Payal Books

Umedicha Ankur by Sandip Ramrao Kale संदीप काळे

Regular price Rs. 222.00
Regular price Rs. 249.00 Sale price Rs. 222.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

‘उमेदीचा अंकुर’ या संदीप काळे लिखित लेखसंग्रहात एकूण ३५ लेख असून, त्यात विविध स्तरातील सामाजिक आशयाचे आणि सकारात्मक अनुभवांचे लेखन आहे. ‘सकाळ’ सप्तरंग पुरवणीच्या ‘भ्रमंती लाईव्ह’ या सदराअंतर्गत संदीप काळे यांनी केलेले हे लेखन आहे. मनाला हुरूप देणारे, समाजात चांगली माणसे अजूनही जिवंत आहेत हे सांगणारे, आणि मनाला त्यातून समाधान देणारे लेखन संदीप काळे यांचे आहे. सातत्यपूर्ण केलेल्या लेखनातून त्यांनी तळागाळातील वंचितांचे म्हणणे या पुस्तकातून अतिशय सकारात्मकपणे मांडले आहे. एक माणूस म्हणून जगत असताना आजूबाजूला असलेले भान त्यांनी त्यांच्या लेखनातून अतिशय संवेदनशीलपणे व्यक्त केले आहे. आजूबाजूला असंख्य धडपड करणाऱ्या माणसांची नोंद घेऊन संदीप यांनी त्यांना उजेडात आणले आहे. एकप्रकारचा सकारात्मक आशावाद पेरायचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे केला आहे.

लेखकाविषयी :

संदीप काळे हे सध्या ‘सकाळ’ माध्यम समूहात युवा संपादक म्हणून कार्यरत असून त्यांची एकूण ६१ पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांनी २२ दिवाळी अंकांचे संपादन केले आहे.१५० हून अधिक विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’पुरवणीत त्यांचे ‘भ्रमंती लाईव्ह’ हे लोकप्रिय सदर सुरू असून ‘सकाळ यंग इन्सपीरेटर नेटवर्क अर्थात ‘यीन’ चे ते प्रमुख आहेत.