PAYAL BOOKS
Udyog Yashogatha By Dr. Anant Sardeshmukh उद्योग यशोगाथा डॉ. अनंत सरदेशमुख
Couldn't load pickup availability
Udyog Yashogatha By Dr. Anant Sardeshmukh उद्योग यशोगाथा डॉ. अनंत सरदेशमुख
उद्योग यशोगाथा' या पुस्तकाबद्दल डॉ. अनंत सरदेशमुख यांचे हार्दिक अभिनंदन. औद्योगिक क्षेत्रातील व्यापक अनुभव, उद्योजकांसोबतचे दीर्घकाळाचे संबंध, औद्योगिक क्षेत्राचा प्रदीर्घ अभ्यास यातूनच डॉ. सरदेशमुखांना व्यावसायिक यशाचे मर्म जाणून घेता आले. अनुभव, अभ्यास व निरीक्षणातून ते एक परिणामकारक दृष्टिकोन प्रस्तुत करू शकले. विविध औद्योगिक क्षेत्रातील आठ यशकथांचे बनलेले हे पुस्तक केवळ उद्योजकीय उत्कृष्टतेचा गौरवच नव्हे, तर उद्योजकतेची आकांक्षा बाळगणार्या भावी व्यावसायिक नेत्यांसाठी प्रेरकही आहे.भारताच्या गतिमान, देदीप्यमान स्टार्टअप परिसंस्थेच्या आणि वेगाने विकसित होणार्या उद्योग-अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ‘उद्योग यशोगाथा' पुस्तकाने योग्य वेळ साधली आहे. त्याचा प्रभाव उभरत्या उद्योजकांवर नक्कीच पडेल. शाश्वत प्रगतीला पायाभूत प्रेरणा, पुढाकार, चिकाटी, नवनिर्मिती या मूल्यांचा समावेश या उद्योग यशोगाथेत आलेला आहे. अवश्य वाचनीय पुस्तक.
संजय किर्लोस्कर
