UDNARI MAGRULI by RAJIV TAMBE
Regular price
Rs. 265.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 265.00
Unit price
per
एकदा एका मगरिणीचं तोंड नदीतल्या दगडावर जोरात आपटलं. तिचं तोंड सुजलं, दाढा आणि दात दुखायला लागले. शिकार करता येईना, काही खाता येईना. मग तिने तिच्या छोट्या मुलीला म्हणजे मगरूलीला सांगितलं, की उडतउडत जा आणि माझ्यासाठी हापूसचे आंबे घेऊन ये; पण मगरूलीला प्रश्न पडला, आपल्याला उडता कसं येणार? मगरिणीकडे होता एक मंत्र. तो मंत्र तिने मगरूलीला सांगितला आणि तो मंत्र म्हटल्यावर मगरूली आकाशात उडू लागली. मग उडताउडता एका डोंगरावर आपटता-आपटता वाचली, मग एका जांभळाच्या झाडाजवळ गेली, तर तिला पाहून झाडावरच्या माकडांमध्ये घबराट पसरली; पण माकडांच्या पळापळीत बरीच जांभळं खाली पडली. भरपूर जांभळं खाऊन मगरूलीने परत केलं उड्डाण आणि एका विमानाला पक्षी समजून ती त्या विमानाबरोबर उडू लागली, तिला पाहून विमानात एकच हलकल्लोळ माजला. शेवटी मिळाले का तिला आंबे? उडणार्या मगरूलीची गंमतजंमत बोलक्या चित्रांसह साकारणारी रंगतदार कथा.