Udayan By Rajendra Kher
Regular price
Rs. 356.00
Regular price
Rs. 395.00
Sale price
Rs. 356.00
Unit price
per
‘कथासरित्सागर’ या सोमदेव शर्मा यांनी रचलेल्या संस्कृत ग्रंथात उदयनकथा विस्ताराने कथन केली आहे. राजेन्द्र खेर यांनी उदयन-वासवदत्ता यांची हीच भावमधुर प्रेमकथा उत्कटतेने रंगवली आहे. कलासक्त उदयन संगीतसाधना आणि विलासात मग्न होतो. त्याचीच परिणती वत्सदेशाच्या पतनात होते. पांडवानंतरच्या पाच पराक्रमी पिढ्यांनी अबाधित ठेवलेल्या सम्राज्याला पराजयाचे ग्रहण लागते. सम्राटपद गमावलेला उदयनराजा वीणावादन आणि नाट्यशालेत मश्गूल असतो. त्याचे वीणावादन इतके कर्णमधुर असते, की त्या स्वर्गीय वादनामुळे श्रोतेच नव्हे, तर पशुपक्षी, मदोन्मत्त हत्ती आणि निसर्गसुद्धा मंत्रमुग्ध होतो. अवंतीनरेश प्रद्योत आपली रूपसुंदर कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकविण्यासाठी उदयनचं कुटिल डाव रचून अपहरण करतो. वीणेच्या प्रशिक्षणकाळात घडलेल्या सहवासातून उभयतांचं परस्परांवर प्रगाढ प्रेम बसतं. कलेच्या साक्षीने त्यांची प्रेमाराधना पुÂलत जाते. वत्सदेशाचे महाअमात्य यौगंधरायण यांच्या मनात पराजयाचं शल्य असतंच, त्यात उदयनच्या अपहरणाच्या व्यथेची भर पडते. ते प्रतिज्ञा करतात... पुढे काय काय वेगवान घटना घडतात ते जाणून घेण्यासाठी ही उत्वंÂठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी. ही कथा जशी उदयन-वासवदत्ता या युगुलाची आहे, तशीच साम्राज्याच्या पुनस्र्थापनेची प्रतिज्ञा घेणारे चाणाक्ष-चतुर महाअमात्य यौगंधरायण यांचीही... अत्यंत रसाळ आणि प्रवाही भाषाशैलीतून कथानक उलगडत असताना अक्षरश: आपले भान हरपते. आपसूकच आलेली भावमुग्धता आपल्याला वैभवसंपन्न इतिहासात घेऊन जाते...