{"product_id":"turungrang-by-ravindranath-patil-तुरुंगरंग-ॲड-रवींद्रनाथ-पाटील","title":"Turungrang By Ravindranath Patil तुरुंगरंग ॲड. रवींद्रनाथ पाटील","description":"\u003cp\u003eTurungrang By Ravindranath Patil तुरुंगरंग ॲड. रवींद्रनाथ पाटील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमला ‘अंडरट्रायल` अर्थात कच्चा कैदी म्हणून येरवडा जेलमध्ये काही \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाळासाठी स्थानबद्ध केलं गेलं होतं. तत्पूर्वी आयपीएस अधिकारी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eम्हणून आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी जेलला भेट दिली होती. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपरंतु त्यावेळी न दिसलेले तुरुंगाचे अंतरंग मला कच्चा कैदी म्हणून \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवावरताना दिसले. त्याचबरोबर तुरुंगातल्या इतर बंद्यांच्या एका \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवेगळ्या भावविश्वाचं दर्शन घडलं. त्यातून कैदी जेलच्या कोंडवाड्यामध्ये \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजगतात कसे, वागतात कसे नि रमतात कसे याचं वास्तव चित्रण शब्दबद्ध \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकरण्याचा प्रयत्न मी या ‘तुरुंगरंग`मध्ये केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअर्थात माणूस गुन्हेगार का होतो आणि समाज म्हणून आपण त्याला \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगुन्हेगारीपासून कसं परावृत्त करू शकतो हेही मला इथं सांगायचं आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइतकंच नाही, तर तुरुंगात कैद्यांचं आयुष्य जसं पणाला लागतं तसंच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eफौजदारी न्यायप्रक्रियाही कशी कैद होते याची स्पष्ट जाणीव करून \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदेण्याचाही माझा प्रयत्न आहे. वाचक म्हणून आपण माझ्या या पहिल्याच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचं स्वागत कराल अशी आशा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजेल आणि कैदी सुधारणा हा विषय तसा दुर्लक्षित राहिला आहे. जेल  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसुधारणांसाठी कैद्यांची दुसरी बाजू ऐकणे आणि त्यांच्या मानसिक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्थितीचा उलगडा करणे, हे अत्यावश्यक आहे. मला खात्री आहे की, \u003c\/span\u003e\u003cspan\u003e‘तुरुंगरंग` हे पुस्तक समाजात जागृती निर्माण करेल. किंबहुना प्रशासन \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजेलकडे केवळ दंड देण्याची जागा म्हणून न पाहता कैद्यांची वर्तणूक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसुधारण्यासाठीचे एक साधन म्हणून बघेल आणि त्या अनुषंगाने नीती \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआखेल. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Book","offers":[{"title":"MANOVIKAS PRAKASHAN","offer_id":48729909690561,"sku":"","price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Turungrang_By_Ravindranath_Patil_..jpg?v=1790514818","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/turungrang-by-ravindranath-patil-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a5%b2%e0%a4%a1-%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}