Turning Points By A P J Abdul Kalam
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
per
चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या आवारातला नेहमीसारखाच एक दिवस. माझे ‘संकल्पना ते ध्येय’ ह्या विषयावरचे व्याख्यान संपले होते आणि ते एक ऐवजी दोन तास चालले होते. संशोधनाचे काम करत असणा-या काही विद्याथ्र्यांबरोबर मी दुपारचे जेवण घेतले आणि परत वर्गाकडे गेलो. संध्याकाळी माझ्या खोलीवर परत जात होतो, तेव्हा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो. ए. कलानिधी बरोबरच आले. ते म्हणाले की, ‘कोणी तरी फोनवरून दिवसभर तुमच्याशी तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.’ आणि खरोखरीच; मी खोलीत पाऊल टाकले, तर फोन वाजतच होता. मी फोन उचलला, तेव्हा पलीकडच्या व्यक्तीने सांगितले, ‘‘पंतप्रधानांना आपल्याशी बोलायचे आहे.’’ काही महिन्यांपूर्वी ‘भारत सरकारचा प्रमुख शास्त्रीय सल्लागार’ ह्या केंद्रीय मंत्रिपदाच्या समकक्ष जागेचा राजीनामा देऊन मी अध्यापनाच्या कामावर परत रुजू झालो होतो. आत्ता जेव्हा मी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी बोलत होतो, तेव्हा माझे आयुष्य एका अनपेक्षित बदलाच्या टप्प्यावर होते. ‘टर्निंग पॉइंट्स’मधील कलाम यांची अशक्य वाटणारी कथा, ‘विंग्ज ऑफ फायर’ जेथे संपते, तेथून पुढे सुरू होते. ह्या कथेत त्यांच्या कारकिर्दीतल्या आणि राष्ट्रपतिपदाच्या कालावधीतल्या कोणाला फारशा ठाऊक नसलेल्या, काही विवादास्पद घटनांबद्दलच्या अनेक बारीकसारीक गोष्टी प्रथमच समोर येतात. यातून एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग तर समजतेच; पण प्रयत्न केले, चिकाटी ठेवली आणि आत्मविश्वास असला, तर अनेक सिद्धी मिळवून, कौशल्ये आणि सामथ्र्ये मिळवून महान वारसा असलेला हा देश पुन्हा महान कसा होऊ शकेल, त्याची संकल्पनाही मिळते. सर्वांत विशेष म्हणजे, ही गाथा आहे एका व्यक्तीने स्वत: आणि इतरांना बरोबर घेऊन केलेल्या प्रवासाची – जो प्रवास भारताला २०२०पर्यंत आणि नंतरही एक ‘विकसित राष्ट्र’ म्हणून उभे करेल.