महान नेतृत्वाला कशामुळे इंधन मिळते?
समुद्राच्या तळाशी खोलवर जाणाऱ्या पाणबुड्यासाठी ऑक्सिजनचे जितके महत्त्व असते तितकेच नेत्यासाठी विकासाचे महत्त्व असते. ऑक्सिजनच्या अभावी जसा पाणबुड्या मरण पावतो तसे तुम्ही विकासाअभावी शारीरिक पातळीवर मृत्यू पावणार नाही;
पण तुमचा प्रभाव नष्ट होईल आणि कालांतराने तुम्ही नेतृत्व करण्याची संधीही गमावून बसाल.
दुर्दैव म्हणजे नेतृत्वाचा असा घात मोठ्या तसेच लहान संघटनांमध्येही दिसून येतो मग ती संघटना नफा वा विना-नफा तत्त्वावर चालणारी असो. जे नेते नेतृत्वाचे पद प्राप्त करतात ते पद टिकवून ठेवण्यात अपयशी ठरतात किंवा काहीजण त्यांच्या अंगभूत गुणांमुळे वरच्या पदावर जातात खरे; पण त्या गुणांना कधीच वाव मिळत नाही.
तरुण उदयोन्मुख नेते ज्यांना झळकण्याची संधीच मिळत नाही त्यांच्याबाबतही हेच दिसते.
त्यांचे सुप्त गुण सुप्तावस्थेतच राहतात. या सगळ्या बाबींमध्ये एक समान तत्त्व काय आहे? वैयक्तिक विकास किंवा त्याचा अभाव.
विकसित होण्यात अपयशी ठरल्यानेच अनेकांच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीचा दुर्दैवी अंत होतो.
आम्ही प्रार्थना करतो की, विकसित होण्याच्या तुमच्या उत्कट इच्छेला हे पुस्तक इंधन पुरवील.
तुम्हाला पटवून देईल की, तुम्ही विकसित होऊ शकता, कसे विकसित व्हावे हे ही तुम्हाला दाखवून देईल आणि तुम्हाला आयुष्यभर विकसित होण्याचे बळ देईल.
तुम्ही विकसित होता होता मजा करा!
– केन ब्लँचर्ड आणि मार्क मिलर
केंद्रित अध्ययनासाठी तत्त्वाधारित महानकथा हा लेखनप्रकार अत्यंत परिणामकारक सिद्ध झाला आहे.
मार्क आणि केन ही जोडी जगातील अत्याधिक यशस्वी लेखक जोडी ठरली आहे.
या पुस्तकाच्या रूपाने या सर्जनशील जोडीने त्यांचे आणखीन एक उत्कृष्ट कार्य निर्माण केले आहे.
हे पुस्तक आपले घर, व्यवसाय आणि एकंदरीत आपले राष्ट्र या सर्व ठिकाणी परिणामकारक नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आहे.”
– अॅन्डी ॲन्ड्यूज, ‘द नोटिसर’ आणि ‘द ट्रॅव्हलर्स गिफ्ट’या न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रमी विक्रीच्या पुस्तकांचे लेखक.