Tumche-Amche SuperHero- Arvind Gupta By Deepa Deshmukh
अफाट बुद्धिमत्ता लाभलेल्या अरविंद गुप्ता यांनी कानपूर
आय.आय.टी.मधून अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली.
पण नंतरच्या उत्तम नोकरीकडे अन् आर्थिक सुबत्तेकडे पाठ
फिरवली. देशातल्या गरिबी आणि बेकारी यांच्या प्रश्नानं
अस्वस्थ होत अनेक सेवाभावी कामात स्वत:ला झोकून दिलं.
कामगारांच्या मुलांसाठी, खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी
शाळा चालवल्या. अतिशय सोप्या पद्धतीने विज्ञानातील
प्रयोग शिकवत मुलांना विज्ञानाची गोडी लावली.
अतिशय अल्प किमतीत आणि टाकाऊ वस्तू यामधून
सहजपणे तयार होणारी सोपी वैज्ञानिक खेळणी बनवली.
मुलांसाठी अनेक पुस्तकं लिहिली आणि अनुवादित केली.
आपल्या जगण्यातूनच साधेपणानं, आनंदानं, मनापासून,
मनासारखं जगण्याचा वेगळा श्रीमंत मार्ग दाखवला.
म्हणूनच अरविंद गुप्ता ठरतात तुमचे आमचे ‘सुपरहिरो!’