Tripadi त्रिपदी BY G N Dandekar
Tripadi त्रिपदी BY G N Dandekar
श्री. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर या बहुआयामी व बहुप्रसव लेखकाच्या चोखंदळपणे निवडलेल्या स्फुट लेखांचा हा नवा संग्रह : त्रिपदी. वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या निमित्तानं लिहिलेले हे लेख आजवर कुठंही संगृहीत झालेले नव्हते. ते आतां या पुस्तकांत एकत्र केले आहेत. या पुस्तकांतील लेखांची प्रकृति लक्षात घेतां त्यांचीही विभागणी सामान्यत: आत्मपर, व्यक्तिविषयक आणि ललितलेख अशी तीन प्रकारांत होते, म्हणूनही त्रिपदी. ह्या सार्याच स्फुट लेखांमधून त्यांचा समृध्द जीवनानुभव, अनुभवाची मांडणी करण्याची त्यांची खास शैली, भाषेच्या नियोजनाचं सामर्थ्य, त्यांच्या लेखनांतील उत्कटता, चित्रवर्णता, माणसा-माणसांमधल्या नात्याकडं पाहण्याची त्यांची खास दृष्टी अशा गोष्टींचा पुन:प्रत्यय येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पांची संवेदनांची त्यांची जाणीव केवढी तीव्र होती, ह्यांचीं अनेकानेक उदाहरणं या लेखांमध्ये आढळतात. दाण्डेकरांमधला परिभ्रामक, संवेदनशील कलावंत, भाषेवर हुकुमत असणारा लेखक, छायाचित्रकार, आपल्याला भावलेलं शब्दांमधून प्रकट करायची ऊर्मि असलेला साहित्यिक या सार्याच स्फुट लेखनांत सर्वत्र भेटत राहतो आणि त्याचा आस्वाद घेत असतांना निखळ आनंद लाभत राहतो.