Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Torajhansek तो राजहंस एक By Bal Samant

Regular price Rs. 530.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 530.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Torajhansek तो राजहंस एक By Bal Samant

तो राजहंस एक 
(नटसम्राट बालगंधर्व यांचे चरित्र)

१९८७ साली महाराष्ट्रात सर्वत्र बालगंधर्वजन्मशताब्दी साजरी करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाला जनतेचे मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. या निमित्ताने अनेक नियतकालिकांनी बालगंधर्वाचा गुणगौरव करणारे खास अंक काढले. लोकसत्ता दैनिकाचे तडफदार आणि झुंजार संपादक माधवराव गडकरी यांनी 'लोकसत्ता" दैनिकाच्या बालगंधर्व विशेषांकात बालगंधर्वावर एक लेख लिहिण्याची विनंती केली. गेली वीस वर्ष बालगंधर्व या विषयावर मी पुष्कळ लिखाण केले आणि ठिकठिकाणी त्यावर भाषणेही केली. त्यामुळे आता बालगंधर्वावर नवीन काय लिहायचे असा प्रश्न पडला. पण माधवरावांचा पस्तीस वर्षाचा स्नेह लक्षात घेता मला त्यांच्यासाठी लेख लिहावा लागला.