भारतीय संस्कृतीशी असलेले माझे संबंध अनेक पदरी आहेत. कारण ते केवळ भारतीय नाहीत, तर संस्कृतीशीच असलेले संबंध आहेत.लेखन ही एक जीवघेणी जोखीम आहे. शाळा-कॉलेजांतून वाङ्मयाचं अध्यापन करणारे लोक आपल्या विद्यार्थ्यांना वाङ्मयाद्वारा संस्कृतीकडे पाहण्याची दृष्टीच देत नाहीत. मानवी जीवनाशी असलेला वाङ्मयाचा आणि कलेचा संबंध विद्यार्थ्यांच्या ध्यानात आणून दिला जात नाही. आपल्या रोजच्या क्रियाप्रतिक्रियांमध्ये त्याला काहीही स्थान नाही, असाच समज करून दिला जातो. मराठीत डोळस वाचकांची नवी पिढी असलीच तर तिच्यात वाङ्मयाचे अध्यापक आणि विद्यार्थी फार कमी आहेत. कारण ते वाङ्मयाकडे एक व्यवसाय म्हणूनच पाहतात. उलट, नवशिक्षित दलित किंवा तंत्रज्ञ, इंजिनियर, डॉक्टर अशा विविध क्षेत्रांतले लोक वाङ्मयाकडे जास्त डोळसपणे पाहताना दिसतात कारण वाङ्मयाकडून त्यांच्या काही सांस्कृतिक अपेक्षा असतात. ..कोणत्याही मनोऱ्यावर बसून मी हे विचार केलेले नाहीत. लोक चालतात त्याच रस्त्यातून लेखक चालतात पण लेखकांना या रस्त्याचं स्वरूप वेगवेगळं दिसतं त्याचा अर्थ वेगवेगळा लागतो,त्याचे दुर्लक्षित तपशील दिसतात. मुख्यत्वेकरून लेखक, कवी आणि कलावंत म्हणून मी जगलो. तिरकस आणि चौकस मधले छोटे-छोटे निबंध त्याच वाटचालीच्या सिंहावलोकनानंतर सुचलेले भाग आहेत.
Payal Books
Tirkas Ani Choukas | तिरकस आणि चौकस by Dilip Purushottam Chitre | दिलीप पुरुषोत्तम चित्रे
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
