Tilakparva By Arwind V Gokhale
३१ जुलै, १९२० ची रात्र. घनघोर पावसाचं अघोरी थैमान. दुसरा दिवस उजाडला खरा; पण मुंबईचं क्षितिज काळवंडलेलं, कोंडलेलं. सरदारगृहाच्या अवतीभवती माणसांचे थवे. त्या कुंद वातावरणात नि अलोट गर्दीत आसवांचे शब्द येरझारा घालताहेत. जड पावलांनी. एक युग संपलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वातंत्र्यलक्ष्मीचा लाडका फकीर. अलम देशाचा कर्णधार. तेल्यातांबोळ्यांचा कैवारी. ब्रिटिशांचा कर्दनकाळ. असंख्य लोकचळवळींचा सूत्रधार. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. खंदा नि खंबीर नेता. कणखर नि करारी सरसेनानी. सावध नि संवेदनशील संघटक. एक ऑगस्ट, १९२०. एका तपस्येची अखेर. टिळक गेले; पण कळ्यांची फुलं करून. नव्या युगाचं बिगुल वाजवून. टिळकांच्या अखेरच्या वर्षांचा हा समग्र आणि मर्मग्राही आढावा. व्यासंगी पत्रकार अरविंद व्यं. गोखले यांच्या लेखणीतून. ‘मंडालेचा राजबंदी' या ग्रंथानंतर - टिळकपर्व