Skip to product information
1 of 2

Payal Books

Three Cups Of Tea By Greg Mortenson, David Oliver Relin Translated By Sindhu Joshi

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
`आम्ही कोणाही व्यक्तीसमवेत काम करण्याचे ठरविल्यास, त्या व्यक्तीबरोबर चहाचे तीन कप पिण्याची आमची परंपरा आहे. चहाचा पहिला कप घेताना तुम्ही आमच्यासाठी अनोळखी व्यक्ती असता. चहाच्या दुसऱ्या कपाबरोबर आमचे तुमच्याशी मित्रत्वाचे नाते जुळते. तिसऱ्या कपाबरोबर आम्ही तुमचे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून स्वागत करतो आणि वेळप्रसंगी कुटुंबासाठी आत्मबलिदान करण्यास आम्ही मागे पुढे बघत नाही.’ – हाजी अली. १९९३ साली के-२ शिखरावरील थरारक आणि अनर्थकारी मोहिमेवर अयशस्वी ठरलेला गिर्यारोहक ग्रेग मॉर्टेनसन, गारठलेल्या आणि पाण्यावाचून शुष्क झालेल्या अवस्थेत, वाट चुकून पाकिस्तानातील काराकोरम पर्वतराजीतील एका दरिद्री खेड्यात पोहोचतो. खेड्यातील लोकांच्या दयाळूपणाने भारावलेला मॉर्टेनसन परत येऊन मुलांसाठी शाळा बांधण्याचे वचन देतो. दिलेल्या वचनाची पूर्तता आणि मिळालेले विस्मयजनक यश याची गोष्ट म्हणजे `थ्री कप्स ऑफ टी’. तालिबानच्या दहशतवादामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशातील वातावरण तंग आणि धोकादायक बनत गेले. परंतु अशा स्थितीत पर्वतराजींच्या कुशीत वसलेल्या आणि कल्पनातीत निसर्गलेणी ल्यालेल्या पाकिस्तानातील दुर्गम खेड्यात मॉर्टेनसन एकच शाळा बांधून थांबला नाही, तर त्याने एकूण पंचावन्न शाळा बांधल्या. ही गोष्ट म्हणजे खिळवून टाकणारे साहस आणि मानवतावादी चैतन्यातून उदयास आलेला आलेख आहे.