The Spiritualist By Megan Chance Translated By M V Kurlekar
Regular price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 288.00
Unit price
per
कधी कधी सत्य हा फार मोठा भ्रम असतो... १८५६ च्या बोच-या थंडीच्या रात्री एव्हेलिन अॅथरटनचा पती एका खास बैठकीमधून परत येताना एका खुन्याचा बळी होतो. त्याची पत्नी एव्हेलिन ही गरीब कुटुंबातील असल्यामुळे तीच खुनी असावी असा संशय घेतला जातो. अॅथरटन परिवार न्यूयॉर्कमधील सधन व उच्चभ्रू वर्गातला. एव्हेलीन एकाकी पडते. पण तिला खुन्याचा शोध घेतल्याशिवाय या किटाळातून बाहेर पडता येणार नव्हते. यावेळी तिच्या पतीचा जिवलग मित्र तिच्या मदतीला येतो. त्याने तिचे वकील-पत्र घेतले, पण याच वेळी परलोक विद्येच्या गूढ विश्वात तिचा प्रवेश होतो. ह्या ठिकाणी मायकेल जॉर्डन ह्या विलक्षण भारून टाकणाNया व्यक्तीशी तिची गाठ पडते. तिची खात्री असते की हा इसम लबाड आहे; पण त्याची मदतच तिला निर्दोष ठरण्यासाठी उपयोगी पडणार असते. जॉर्डनच्या सान्निध्यात तिचा प्रवेश एका विलक्षण चमत्कारिक विश्वात होतो. तिला मृतात्म्यांचे आवाज ऐकु येऊ लागतात. या भितीदायक विश्वामध्ये ती एकाच वेळी खेळीया पण असते व खेळातील एक प्यादे पण. कुणावर अगदी स्वत:वरही कसा विश्वास ठेवायचा हे तिला समजेनासे होते. तिची सासरची माणसे तर तिला खुनी ठरवून फासावर चढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. वेळ भर्रकन निघून चाललेला असतो. भूतकाळातील पिशाच्च्यांना सामोरे जाण्याशिवाय तिला गत्यंतर नसते. मेगन चान्स या पॅसिफिक नॉर्थवेस्ट येथे वास्तव्यास आहेत. त्यांची अन्य दोन पुस्तके आहेत ‘अॅन इनकन्व्हिनिअंट वाइफ’ व ‘सुसान मॅरो’