The Partner By John Grisham Translated By Vibhakar Shende
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
per
चार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस. लॅनिगन. फेब्रुवारी, १९९२मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली. तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणार्या कंपनीत ‘पार्टनर’ होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं – सुंदर पत्नी, गोड मुलगी आणि उज्ज्वल भविष्यकाळ! त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते! आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं – हो, अजूनही तो जिवंत आहे!