The old man and the seaद ओल्ड मॅन अँड द सी अर्नेस्ट हेमिंग्वे by Bharati Pande
द ओल्ड मॅन अँड द सी (सचित्र आवृत्ती)
अर्नेस्ट हेमिंग्वे (नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक)
साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेली कादंबरी!
"आशा न करणं मूर्खपणाचं आहे, ते पाप आहे असं त्याचं म्हणणं होतं."
हवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा. हेमिंग्वेची ही उत्कृष्ट कथा आहे एक म्हातारा, एक लहान मुलगा आणि एक महाकाय मासा यांची कहाणी. या कमालीच्या शौर्यकथेने हेमिंग्वेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल.
अर्नेस्ट हेमिंग्वे
अर्नेस्ट हेमिंग्वेचा जन्म १८९९ साली अमेरिकेच्या इलिनॉय प्रांतातील ओक पार्क येथे झाला. बयाच्या सतराव्या वर्षी त्याने कॅन्सास सिटी येथील एका वृत्तपत्राच्या कचेरीत कामाला सुरुवात केली. युनायटेड स्टेट्सने पहिल्या महायुद्धामध्ये प्रवेश केल्यानंतर तो इटालियन सैन्यामध्ये रुग्णवाहिका पथकामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करू लागला. युद्धआघाडीवर काम करत असताना, जखमी झाल्यामुळे त्याला बराच काळ रुग्णालयामध्ये घालवावा लागला. इटालियन सरकारने त्याचा गौरवही केला. युनायटेड स्टेट्समध्ये परतल्यानंतर तो कॅनेडियन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी काम करू लागला. लबकरच त्याला 'ग्रीक रेव्होल्युशन'सारख्या घटनांचे वार्तांकन करण्यासाठी युरोपमध्ये पाठवण्यात आले.
१९२०च्या दशकामध्ये हेमिंग्वे पॅरिसमधील परदेशी अमेरिकन लोकांच्या गटाचा सदस्य बनला. या गटाचे वर्णन त्याने आपल्या 'द सन ऑल्सो रायजेस' या पहिल्या महत्त्वाच्या लेखनामध्ये केले आहे. त्याची १९२९ सालची कादंबरी 'अ फेअरवेल टू आर्म्स' हीसुद्धा तेवढीच यशस्वी ठरली. या कादंबरीमध्ये त्याने एका रुग्णवाहिका चालकाचे अनुभव, युद्धाविषयीचा त्याचा झालेला भ्रमनिरास आणि त्याने आपले पद सोडून काढलेला पळ याचे चित्रण केले आहे. हेमिंग्वेने १९४० मध्ये लिहिलेल्या 'फॉर हम द बेल टोल्स' या आपल्या सर्वांत महत्त्वाकांक्षी कादंबरीसाठी स्पेनमधील यादवी युद्धामध्ये त्याला आलेल्या अनुभवाचा वापर केला आहे. त्याच्या नंतरच्या लेखनामध्ये सर्वांत लक्षणीय अशी ठरलेली लघुकादंबरी म्हणजे १९५०मध्ये लिहिलेली 'द ओल्ड मॅन अँड द सी'. तिला नोबेल पारितोषिक मिळाले. ही एका कोळ्याच्या प्रवासाची, एका माशाबरोबरच्या आणि समुद्राबरोबरच्या त्याच्या एकाकी झगड्याची आणि जिंकूनही हरण्याची कहाणी आहे.
*****************************