Payal Books
The Mystery Of The Blue Train | द मिस्टरी ऑफ द ब्लू ट्रेन Author: Madhukar Toradmal|मधुकर तोरडमल
Couldn't load pickup availability
‘ब्लू ट्रेन’ ही आरामगाडी फ्रान्समधल्या नाईस या स्टेशनवर येऊन थांबताच शांतपणे झोपलेल्या रुथ केटरिंग हिला झोपेतून उठवण्याचा गार्ड प्रयत्न करतो, पण कायमचीच झोप लागलेली ती जागी होईल कशी? जबरदस्त घाव घालून कोणीतरी तिचा चेहरा ओळखू न येण्याइतका विद्रूप केलेला असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्याजवळचे मौल्यवान माणीकही नाहीसे झालेले असतात.
या खुनातला प्रमुख संशयित म्हणजे रुथशी संबंध तोडलेला तिचा नवरा डेरेक; पण पायरोची त्याबद्दल खात्री पटलेली नसते, म्हणून पायरो खून होईपर्यंत गाडीने केलेल्या प्रवासाची चित्तथरारक पुनरावृत्ती नाटक सादर करावे तशी करतो.
‘अभिजात परंपरेला शोभेल अशीच ही सन्माननीय थरारकथा आहे.’
न्यूयॉर्क हॅरॉल्ड ट्रिब्यून
‘गुन्हेगारीची थरारक कथा सांगणारी ही कादंबरी म्हणजे एक एक्स्प्रेसच आहे.’
- संडे एक्सप्रेस
