THE MIND GYM MALA VEL HAVAY by MIND GYM
Regular price
Rs. 385.00
Regular price
Rs. 430.00
Sale price
Rs. 385.00
Unit price
per
THE MIND GYM MALA VEL HAVAY by MIND GYM
‘द माइंड जिम – मला वेळ हवाय’ या श्याम भुर्के अनुवादित पुस्तकाचा आशयच मुळात ‘`वेळ’ हा आहे. आपली कायम तक्रार असते, ‘वेळ पुरत नाही... वेळच नाही.. वेळ कसा काढू? इत्यादी इत्यादी. या नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा प्रकाश ‘द माइंड जिम – मला वेळ हवाय’ या पुस्तकाने टाकलाय. ‘आयुष्य हे फार लहान आहे’ असं आपण म्हणतो खरं; पण दोन हजार वर्षांनी आपलं आयुष्य तिप्पट होण्याची शक्यता आहे. तरीही वेळ कमी पडतो ही तक्रार आतासारखीच राहणार असं जे म्हटलं जातं त्यात प्रश्नही तेच आणि उत्तरही तेच राहणार असं दिसतंय; परंतु तसंच जगायचं नसेल तर, ‘द माइंड जिम’ चा मनाचा व्यायाम रोज करायलाच हवा. ‘आपल्याला चांगला आणि वाईट वेळ याची पाहणी करायची सवय लागल्यावरच भविष्यात आपण चांगले निर्णय घेऊ शकतो; परंतु त्यावर विचार करण्यात तासन्तास घालवू नये. आपल्याकडील वेळेची संपत्ती मोजण्याची साधनेही आहेत. आपण कदाचित ती वापरणार नाही; पण ती वापरल्यास पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपण वेळेचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने करतोय हे कळेल.’ काही काळात आपण आपल्या वेळेच्या सवयी बदलू शकतो; परंतु त्या एका रात्रीत बदलणं अवघड आहे. ‘वेळ काढून वेळ सत्कारणी लावू!’