Skip to product information
1 of 2

Payal Books

The Millionaire Next Door द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर  By Suniti Kane

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

अनेक लोक स्वत:लाच प्रश्न विचारतात, ‘‘मी पुरेशी संपत्ती का जोडू शकलो नाही?’’ बहुसंख्य वेळा असा प्रश्न विचाारणार्‍यांमध्ये कष्टाळू, सुशिक्षित, मध्यम ते उच्च उत्पन्नधारक व्यक्तींचा समावेश असतो. मग इतके कमी लोक सधन असण्यामागचं कारण काय? याचं उत्तर ‘द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर’ हे सर्वोच्च खपाचं पुस्तक जवळजवळ दोन दशकांपासून देत आहे. अमेरिकेतील श्रीमंतांची आश्चर्यजनक गुपितं सांगणारं हे पुस्तक आता नव्या आवृत्तीद्वारे डॉ. थॉमस जे. स्टॅनले यांनी एकविसाव्या शतकासाठी नव्यानं लिहिलेल्या प्रस्तावनेसह वाचकांच्या भेटीला येत आहे. लेखकांच्या मते अमेरिकेत श्रीमंत कसं बनता येतं याबद्दल बहुसंख्य लोकांचे विचार हे पूर्णत: चुकीचे असतात. अमेरिकेतील व्यक्तींनी जोडलेली संपत्ती बर्‍याच वेळा वारसा हक्कानं मिळालेली संपत्ती, उच्च पदवी किंवा हुशारी यांपेक्षाही परिश्रम, नेटानं टाकलेली शिल्लक आणि कमाईपेक्षा खूप कमी खर्चाचं राहणीमान यांचं फळ असतं. ‘द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर’ हे पुस्तक ज्या लोकांनी संपत्ती जोडलेली आहे त्यांच्या अंगी असलेल्या सात समान गुणधर्मांचा शोध घेऊन त्यांचा वारंवार उल्लेख करतं. उदाहरणार्थ, दशलक्षाधीश वापरलेली गाडी विकत घेताना भरपूर घासाघीस करतात, आपल्या संपत्तीचा अगदी लहानसा हिस्सा प्राप्तिकरापोटी भरतात, आपल्याजवळील संपत्तीचा मुलांना मोठ्या वयापर्यंत थांगपत्ताही लागू न देता मुलांचं संगोपन करतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला श्रीमंतांकडून अपेक्षित असलेली खर्चीक जीवनशैली पूर्णपणे टाळतात. अशा अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला या पुस्तकात माहिती मिळेल आणि ते हेही सांगेल की, या देशातले जवळजवळ सर्व खरेखुरे धनवान लोक बेव्हर्ली हिल्स किंवा पार्क अ‍ॅव्हेन्यूवर राहत नाहीत तर ते तुमच्या-आमच्या शेजारीच राहतात!

 

‘द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर’ हे पुस्तक लिहिण्यापूर्वी जवळजवळ एक संपूर्ण वर्षभर मी 1982 ते 1996 दरम्यान घेतल्या गेलेल्या मुलाखतींचे अहवाल काळजीपूर्वक वाचत होतो. मला वाटतं की, इतकं विस्तृत संशोधन आणि त्याची मीमांसा यांवर आधारित असल्यामुळेच हे पुस्तक कायम ‘बेस्टसेलर’ राहिलं आहे. या पुस्तकाच्या किमतीत, वाचक 10 लाख (एक मिलियन) डॉलर्स किमतीचं मौलिक संशोधन आणि विश्लेषण विकत घेऊ शकतो.

मी सतत श्रीमंत लोकांबाबतच का लिहीत राहतो? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हे काही मी श्रीमंतांच्या फायद्यासाठी करत नसतो! ज्या लोकांच्या डोक्यात ‘श्रीमंत असणं म्हणजे काय’ या संदर्भात गोंधळ असतो किंवा ज्यांना त्याबद्दल चुकीची माहिती असते, त्यांना बोध व्हावा म्हणून मी हा प्रपंच मांडत असतो. बर्याचशा अमेरिकी नागरिकांना श्रीमंत कुटुंबाच्या अंतर्गत जीवनशैलीबद्दल काहीही कल्पना नसते. जाहिरात व्यवसाय आणि हॉलिवुडचे सिनेमे यांनी जी भडक चित्रं रंगवून आपली दिशाभूल केलेली आहे, त्यामुळे आपल्याला श्रीमंती आणि विपुल खर्च हेच समीकरण अविभाज्य वाटू लागलंय. प्रत्यक्षात मात्र मी वेळोवेळी म्हटलंय त्याप्रमाणे, बहुसंख्य श्रीमंत लोक त्यांच्या ऐपतीच्या मानानं कमी दर्जाच्या राहणीमानात राहत असतात. दुर्दैवानं बर्याच अमेरिकी नागरिकांची (गैर)समजूत असते की, रक्कम वाढताक्षणी ती खर्चून टाकली की ते श्रीमंतांचं अनुकरण ठरेल! परंतु श्रमजीवी श्रीमंत किंवा ‘मिल्यनेअर नेक्स्ट डोअर’ तसं वागत नाहीत. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या एका लक्षाधीश स्त्रीनं मला म्हटलं होतं,

‘‘कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर मला आणि माझ्या (इंजिनिअर) पतीला उत्तम नोकर्या लागल्या. आम्ही दोन पगारांपैकी एका पगारात खर्च भागवत होतो आणि दुसरा पगार शिल्लक टाकत होतो. पगारवाढ मिळाली तरी वाढीव पगार आम्ही शिल्लक टाकत होतो. आम्ही त्याच बेताच्या किमतीच्या 1900 चौरस फुटांच्या घरात गेली 20 वर्षं राहत आहोत... कधीकधी माझी मुलं मला विचारतात की, ‘आपण गरीब आहोत का?’ कारण मी त्यांना नेहमी एक डॉलर किमतीच्या मेन्यूमधून जेवण मागवायला सांगत असते.’’

अमेरिका हा अजूनही भरपूर संधी उपलब्ध करून देणारा देश आहे. गेली 30 वर्षे मी सतत पाहत आलोय की, 80 ते 85 टक्के लक्षाधीश हे स्वत:च्या कष्टांनी वर आले आहेत. स्वत: स्वत:ची मालमत्ता वाढवणं ही त्यांना अभिमानाची, आनंदाची आणि समाधान मिळवून देणारी गोष्ट वाटते. असंख्य लक्षाधीशांनी मला त्यांच्या मनीचं गुज सांगितलं आहे की, लखपती बनण्याच्या अंतिम टप्प्यावर पोहोचण्यापेक्षा तिथवरचा प्रवासच त्यांना अधिक समाधान मिळवून देत होता.

ते मागे वळून त्यांच्या उद्दिष्टांपर्यंतच्या प्रवासाकडे बघतात तेव्हा नवनवी आर्थिक उद्दिष्टं उभारणं आणि ती साध्य करणं यातून त्यांनी मिळवलेलं समाधान अजूनही स्पष्टपणे आठवतं. खरोखरच आर्थिक यशप्राप्तीच्या संदर्भात आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत पोहोचवणारा प्रवासच या लक्षाधीश शेजार्यांना अभिमानास्पद वाटत असतो आणि त्याबद्दलच ते बरेचदा गर्वानं बोलत असतात!

- थॉमस जे. स्टॅनले, पीएच. डी.