PAYAL BOOKS
The Lord of the Rings-Part 1 to 3) By J R R Tolkien, Mugdha Karnik
Couldn't load pickup availability
The Lord of the Rings-Part 1 to 3) By J R R Tolkien, Mugdha Karnik
1) जे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘मुद्रिकेचे साथीदार’ हा पहिला भाग आहे.
कृष्णशक्तीचा स्वामी सॉरॉन याने शक्तिमान मुद्रिका मिळवल्या आहेत. या मुद्रिकांच्या जोरावर तो मध्य-वसुंधरेवर अधिराज्य गाजवू इच्छितो. या सर्व मुद्रिकांवर अंमल असलेली सर्वशक्तिमान मुद्रिका मात्र त्याच्याकडे नाही. ती बिल्बो बॅगिन्स नावाच्या हॉबिटला गवसली आहे.
शायरमधील एका सुस्त गावात, म्हातार्या बिल्बोचा तरुण पुतण्या फ्रोडो बॅगिन्स याच्या समोर एक मोठी कामगिरी उभी राहिली आहे. बिल्बोने ती मुद्रिका त्याच्याकडे सुपुर्द केली आहे. स्वतःचं घर सोडून फ्रोडोला मध्य-वसुंधरेच्या भूप्रदेशांमधून विपदांनी भरलेल्या वाटा धुंडाळत अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्निरसाच्या खाईपर्यंत जाणं भाग आहे. तिथे जाऊन ती मुद्रिका नष्ट केल्यावरच कृष्णशक्तीच्या स्वामीचा पाडाव होणार आहे.
2) जे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘ते दोन मनोरे’ हा दुसरा भाग आहे.
कृष्णशक्तीचा साथीदार सॉरॉनच्या हाती सर्वशक्तिमान मुद्रिका पडू नये म्हणून ती अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्नीरसाच्या दरीत नष्ट करण्याच्या कामगिरीवर फ्रोडो आणि मुद्रिकेचे साथीदार निघाले आहेत. वाटेत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मोरियाच्या खाणीत एका दुष्टात्म्याशी लढा देताना त्यांना जादूगार गॅन्डाल्फला गमावावं लागतं. रौरॉसच्या धबधब्यापाशी मुद्रिकेच्या शक्तीच्या मोहात पडून बोरोमीर ती बळाने काबीज करण्याचा प्रयत्न करतो. इतर साथीदारांवर ऑर्क्सचा हमला झाला असतानाच फ्रोडो आणि सॅम तिथून वेगळ्या मार्गाने प्रवास सुरू करतात.
आता महानदी अँड्युइनच्या काठाने एकटा प्रवास करत असताना एक गुढ व्यक्ती त्यांचा सतत पाठलाग करत आहे.
3) जे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘राजाचे पुनरागमन’ हा तिसरा आणि अंतिम भाग आहे.
मुद्रिकेचे साथीदार वेगवेगळ्या मोहिमांमध्ये गुंतले आहेत. अॅरगॉर्न प्राचीन राजांचा वारस म्हणून पुढे आला आहे. रोहॅनच्या अश्वयोद्ध्यांच्या साथीने तो आयसेनगार्डच्या सैन्याशी लढाई करून हॉनबर्ग इथे विजय संपादित करतो. ऑर्क्सच्या ताब्यातून निसटून मेरी आणि पिपीन कॅनगॉर्नच्या जंगलात शिरतात आणि त्यांची एन्टसशी भेट होते. गॅन्डाल्फ चमत्कारिकरित्या परत येऊन दुष्ट जादूगार सारूमानचा पराभव करतो.
इकडे सॅम आणि फ्रोडो मुद्रिका नष्ट करण्यासाठी मॉर्डॉरच्या दिशेने वाट काढत आहेत. आता स्मिगल उर्फ गॉल्लम त्यांच्या सोबतीला आहे. अजूनही तो त्याच्या ‘अनमोल सोनुली’मागे वेडापिसा आहे. शीलॉब या महाकाय कोळ्याशी झुंज दिल्यानंतर सॅम त्याच्या मालकाला मृत समजून सोडून देतो, पण फ्रोडो जिवंत आहे आणि तो ऑर्क्सच्या ताब्यात सापडलाय. इकडे कृष्णशक्तीच्या स्वामीच्या फौजा गोळा झाल्या आहेत.
