Payal Books
The Legend of Laxmi Prasad (Marathi)
Couldn't load pickup availability
ट्विंकल खन्नाने आपल्या कसवार लेखनातून काही महत्वाच्या विषयांना हात घातला आहे| हे विषय आपल्या मनाचा जेव्हा ठाव घेतात, तेव्हा वरवर पाहता त्यातल गांभीर्य नाहीसे झाले असे वाटले तरी विषयाची खोली यात्र तशीच असते|
Elle
एका उंच, सडसडीत तरुणीने आपल्या क्रांतिकारक कल्पनेने संपूर्ण गावाचा कायापालट करुन टाकला| ६८ वर्षाच्या नोनी आपा एका विवाहित सद्गृहस्थाकडे नकळत ओढल्या गेल्या| एके क्षणी त्यांच्या मनात आले : प्रत्येक नात्याला नाव द्यावे, असे लोकांना का वाटते? आणि तसे करीत असताना प्रत्येक शब्द इतका अधोरेखित का करावा, की तो शब्द लिहिलेला कागदही फाटून जावा? स्वस्त सॅनिटरी पॅड्स तयार करण्याच्या ध्यासापायी बबलू केवट कमालीचा झपाटलेला जातो| इतका की त्या वेडापायी त्याला अनंत संकटे अंगावर झेलावी लागतात| पण बबलूचे वेडच एक नवा इतिहास घडवते| एक मुलगी हवामानाचे अंदाज आणि प्रत्यक्षात असलेली हवामानाची स्थिती ह्यांच्यावर सतत लक्ष ठेवून असते| हे करीत असतानाच ती स्वतःच्या पाच लग्नांचे अगदी पद्धतशीर नियोजन करते| अत्यंत मिस्किलता, अचूक निरीक्षणे आणि शहाणपणा यासह लेखिकेने अत्यंत मोहक पण आकर्षक पद्धतीने प्रत्येक कथा उलगडून दाखवली आहे| ही उलगडण्याची प्रक्रिया इतकी हळूवार आहे की वाचक नकळत कथाप्रवाहात ओढला जातो|

