Payal Books
The Half Mother By Shahnaz Bashir Translated By Geetanjali Vaishampayan
Couldn't load pickup availability
‘ती काळोखी रात्र थकली आहे. दूरवर आभाळात उगवलेला तो चंद्रही खूप थकला आहे.’
साल सुमारे 1990. काश्मीर नुकतंच धगधगू लागलं होतं. ज्यांना सुरुवातीला याची झळ पोहोचली, ते गुलाम रसूल जू हे हलीमाचे वडील. पहिल्या दुर्दैवी लोकांपैकी एक. त्यांचा बळी जातो आणि तिचा दहावीची परीक्षा दिलेला मुलगा इमरान याला चौकशीसाठी पकडून नेलं जातं. पुढे त्याचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.
ही कादंबरी हलीमाचं - आधी एक मुलगी, एक आई आणि नंतर ‘अर्धी आई’, अनाथ स्त्री अशा अनेक नात्यांमधून चित्रण करते. नवर्याने सोडलं आहे. वडील डोळ्यांदेखत मारले गेले आणि पोटचा मुलगा हरवला आहे. यामुळे हलीमा सैरभैर होते. मात्र, लवकरच ती मुलाच्या शोधासाठी कंबर कसते. आर्मी छावण्या, तुरुंग, शवागार, हॉस्पिटल... सगळीकडे ती मुलाचा झपाटल्यासारखा शोध घेते. तिच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात का? शेवटी नेमकं काय होतं?
तिची कहाणी शहनाज बशीर यांनी ‘द हाफ् मदर’ या कादंबरीत सांगितली आहे. प्रत्ययकारी वर्णन आणि काश्मीरी लोकजीवनाची पार्श्वभूमी यांमुळे ती वाचकांवर विलक्षण परिणाम करते.
