Skip to product information
1 of 2

Payal Books

The Greatest Salesman In the World | ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड by AUTHOR :- Og Mandino

Regular price Rs. 88.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 88.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

‘द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ हे पुस्तक मी वाचलेल्या प्रेरणादायी,
प्रवृत्त करणाऱ्या, उन्नत करणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे.
– नॉर्मन विन्सेंट पील
प्रत्येक पिढी, तिचे स्वतःचे असे ‘शक्तीचे साहित्य’ निर्माण करीत असते.
अंश साहित्यातून वाचणाऱ्याचे जीवन शब्दशः बदलण्याची ताकद अशा प्रकारच्या असते.
याच परंपरेतील,’द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’
या पुस्तकाच्या वाट्याला अगणित व्यक्तींचे जीवन प्रभावित करण्याचे श्रेय जाणार आहे.
दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हफीद नावाच्या एका उंट राखणाऱ्या मुलाविषयी आणि जीवनातील त्याचे कनिष्ठ दर्जाचे स्थान सुधारण्यासाठीच्या त्याच्या मनातील ज्वलंत इच्छेविषयीची ही एक आख्यायिका आहे.
त्याच्यातील सुप्त क्षमता सिद्ध करण्यासाठी, त्याला मोठ्या काफिल्याच्या व्यापाऱ्याद्वारे- पाथ्रोसद्वारे बेथलहेमला पाठविले जाते, केवळ एक झगा विकण्यासाठी.
ते विकण्यात तो अपयशी ठरतो आणि दयेच्या एका क्षणात वाहवून ते अमूल्य वस्त्र, त्याच्या खाणावळीजवळील एका गुंफेत, एका नवजात बालकाला ऊब मिळावी म्हणून देऊन मोकळा होतो..
हफीद काफिल्यात ओशाळवाणा होऊन परत येतो; पण तो येत असताना एक तेजाने झळाळणारा तारा त्याच्या डोक्यावर प्रकाशत असतो. पाथ्रोस या घटनेचा अर्थ एक दैवी संकेत असा करतो आणि हफीदला दहा प्राचीन चर्मपत्रे देतो, ज्यांच्यात या मुलाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे ज्ञान सामावलेले असते.
या कालाबाधित कहाणीत मूळ चर्मपत्रांतील संपूर्ण लिखाण सामावलेले आहे.
हफीद जगातील सर्वांत महान सेल्समन बनण्यासाठी या लिखाणातील रहस्यांचा व्यवहारात वापर, करतो.
आणि त्यांनी त्याच्यासाठी जी सिद्धी खेचून आणली, तशीच ते तुमच्याहीबाबत करू शकतात…
कारण आपण सगळेच ‘सेल्समन’ असतो…
आणि आपण आपल्या स्वतःला इतरांना कसे ‘विकतो’ यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते.