Skip to product information
1 of 2

Payal Books

The Case Of The Haunted Husband By Erle Stanley Gardner Translated By Jyoti Aphale

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
"काकांच्या श्रीमंतीला आणि त्यातून आलेल्या अरेरावीला कंटाळलेली स्टीफन क्लेअर घराबाहेर पडते आणि एका हॉटेलमध्ये साधीशी हॅटचेकिंग गर्ल म्हणून काम करू लागते. आई-वडिलांचा आधार बालपणीच हरवलेला. हॉटेलमध्ये टीप चोरल्याचा आळ आल्याने तिथूनही बाहेर पडते. निसर्गदत्त सौंदर्य लाभलेल्या स्टीफनला वेध लागतात हॉलिवूडचे, अभिनेत्री म्हणून नशीब अजमावण्याचे! गाडीभाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने लिफ्ट घेऊन सॅनफ्रान्सिस्कोला जावे हा तिचा विचार पक्का होतो; ती तो अमलातही आणते; पण हाय रे दैवा! लिफ्ट देणारा इसम तिच्याशी अतिप्रसंग करू पाहतो. ती प्रतिकार करू लागते. त्या झटापटीत त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि भयंकर अपघात होतो. त्या ठिकाणाहून तो मागल्या पावली निघून जातो आणि स्टीफनवर गाडी चोरल्याचा, निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आळ येतो. वृत्तपत्रातून मॅक्स अंकलना ही बातमी कळते. बातमीवरून तिचा ठावठिकाणा शोधत ते तिच्या मदतीला धावून येतात. सोबत तिच्याविषयी कळकळ वाटणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंडलाही घेऊन येतात. या आरोपातून तिला सोडवायचे वकीलपत्र पेरी मॅसन घेतो. त्या गाडीचा शोध घेत घेत पेरी मॅसन हॉलिवूडपर्यंत पोहोचतो. तिथल्या एका प्रसिद्ध निर्मात्याची, जूल्स होमनची ती गाडी. ग्रिलीच्या पत्नीचे आणि त्याचे प्रेमसंबंध जुळतात. त्याच्या प्रेमात आंधळी झालेली मिसेस ग्रिली जिवावर उदार होऊन काय वाट्टेल ते करायला तयार होते. नवऱ्याच्या अनुपाQस्थतीत होमन तिला पर्वतराईतल्या गुप्त ठिकाणी घेऊन जातो. टॅनरच्या सांगण्याबरहुकूम तिथे पोहोचलेल्या ग्रिलीला होमनची गाडी दिसते. आपण फसले गेल्याचे लक्षात येताच होमन आणि मिसेस ग्रिली गाडी तिथेच टाकून विमानाने आपापले घर गाठतात. होमन आपली गाडी चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवतो. तीच गाडी घेऊन येताना ग्रिली स्टीफन क्लेअरला लिफ्ट देतो. निष्पाप स्टीफन विनाकारण गोवली जाते. यातून स्टीफनला सोडवताना पेरी मॅसनला दोन मृतदेह आढळतात. खरे तर स्टीफन क्लेअर निर्दोष असल्याचे सिद्ध झाले की संपले त्याचे काम; पण स्वस्थ बसेल तो पेरी मॅसन कसला! या खुनांचा छडा लावण्यासाठी तो पोलिसांना मदत करायचे ठरवतो. होमनच्या कीर्तीला धक्का लागू नये म्हणून ते खून करते ती... अखेर पेरी तिला विचित्र सल्ला देतो अन् या धक्कादायक गोष्टीचा शेवट होतो... "