Skip to product information
1 of 2

Payal Books

The Case Of Ice Cold Hands By Erle Stanley Gardener Translated By Bal Bhagwat

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
"वेगळेच नाव धारण करून नॅन्सी बँक्स एक अगदी साधे काम घेऊन अ‍ॅटर्नी पेरी मेसनकडे आली. तिने रेसकोर्सवर डो बॉय नावाच्या एका घोड्यावर पाचशे डॉलर्स लावले होते. तिच्याकडे शंभर शंभर डॉलर्सची पाच तिकिटे होती. तो घोडा जर शर्यंत जिंकला असेल तर दुसरया दिवशी मेसनने रेसकोर्सवर जाऊन, ती तिकिटे खिडकीवर देऊन, जिंकलेले पैसे घ्यायचे होते आणि ती सांगेल त्या ठिकाणी तिला द्यायचे होते. दुसNया दिवशी पैसे घेत असताना पोलीसच मेसनला अडवतात. त्याला कळते की, नॅन्सी बँकचा भाऊ रॉडने बँक्स याने माव्र्हिन फ्रेमॉन्टकडे नोकरी करत असताना पैशांची अफरातफर केली होती, ते पैसे त्याच घोड्यावर लावले होते आणि तो घोडा रेस जिंकला होता. माव्र्हिन फ्रेमॉन्टचे म्हणणे असते की नॅन्सी बँक्स त्यांची साथीदार होती, अपहार केलेले पैसेच घोड्यावर लावले आहेत आणि ते पैसे आणि रॉडने बँक्स याने कमावलेला नफा यावर त्याचाच हक्क आहे. रॉडने बँक्सला तर पैशांमधून त्याने चोरलेले पैसे रॉडने बॅक्स त्याला परत करू शकत होता. पण फ्रेमॉन्टला पैशांची भरपाई नकोच असते. रॉडने बँक्सला तुरुंगातच अडकवायचे असते, कारण त्याची बहीण नॅन्सी बँक्स हिने, तो तिच्या मागे लागलेला असताना त्याला दाद दिली नव्हती; उलट त्याला थप्पड मारून त्याचा अपमानच केला होता. मेसन पैसे घेऊन ते पोचवायला नॅन्सी बँक्सकडे गेल्यावर ती त्याला रॉडने बँक्सचा जामीन भरण्यासाठी पैसे देऊन त्याची तुरुंगातून सुटका करायला सांगते. मेसन त्याचा जामीन भरतो आणि त्याची सुटका करतो. पैशांचे व्यवहार बघण्यासाठी तिने फोले मोहेलमध्ये एक केबिन भाड्याने घेतलेली असते. आपले काम पुरे झाले आहे या समजुतीखाली मेसन असताना त्याने परत तिला तातडीने भेटावे, असा तिचा निरोप मिळतो. परिस्थिती आणीबाणीची आहे असेही त्याला कळते. तो जेव्हा फोले मोटेलमध्ये जातो तेव्हा त्याला केबिनच्या स्नानगृहामध्ये माव्र्हिन फ्रेमॉन्टचे प्रेत पडलेले आढळते. पेरी मेसन स्नानगृहामधून बाहेर येतो आणि नॅन्सी बॅक्स घाईघाईने केबिनमध्ये शिरते आणि त्याचे हात आपल्या हातात घेते. तिचे हात बर्फासारखे थंडगार असतात. तिच्याशी उलटसुलट बोलल्यावर त्याच्या लक्षात येते, की तिने खरे तर प्रेत आधीच बघितलेले असते; पण तिची इच्छा असते की ते पेरी मेसनलाच प्रथम दिसले, असा सर्वांचा समज व्हावा. नॅन्सी बँक्स नंतरही त्याच्याशी खोटेच बोलत राहते. वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य पुरावा दाखवत असतो की खून नॅन्सी बँक्सनेच केलेला आहे, एवढेच नाही तर खून नक्की कोणत्या वेळी पडलेला आहे याबाबत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रेताभोवती ड्राय आइसची खोकीही तिने रचून ठेवली होती. या परिस्थितीतही पेरी मेसनचे अंतर्मन त्याला सांगत राहते की खून तिने केलेला नाही. ती त्याची अशील होती आणि तो तिची सुटका करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असतो. खटल्यादरम्यान वेगळीच परिस्थिती निर्माण होते आणि तांत्रिक मुद्द्यांवर तिची सुटका होऊ शकेल, अशी चिन्हे दिसायला लागतात. पण खून करून तांत्रिक मुद्द्यावर सुटली असा कलंक माथी घेऊन तिने आयुष्य काढावे, हे पेरी मेसनला मान्य नसते. खरा खुनीच शोधायला हवा, अशी त्याची धारणा असते. तो साक्षीदारांची उलटतपासणी सुरू करतो. माव्र्हिन फ्रेमॉन्टकडे मॅनेजर-बुक कीपर म्हणून काम करणारा लार्रोन हॉलस्टेड याने डॉलर्सच्या काही नोटांचे क्रमांकही लिहून ठेवलेले असतात. त्याने लिहून ठेवलेले क्रमांक पेरी मेसन बघतो आणि इतरांचे दुर्लक्ष झालेल्या एका साध्या गोष्टीकडे त्याचे लक्ष जाते आणि सर्वच उलगडा होतो. अर्ल स्टॅन्ले गार्डनर यांच्या इतर उत्कंठावर्धक पुस्तकांप्रमाणेच शेवटपर्यंत खर्या खुन्याचा चेहरा समोर न आणणारे आणि एकदा वाचायला सुरुवात केल्यावर वाचून संपवेपर्यंत खाली ठेवता न येणारे आणखी एक पुस्तक. कोर्टाची पाश्र्वभूमी असणारया रहस्यकथा लिहिणारा अर्ल स्टॅन्ले गार्डनरसारखा लेखक आजपर्यंत झालेला नाही. "