Payal Books
The Art of War युद्धकला सून त्सू
Regular price
Rs. 133.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 133.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सून त्सू (इ.स.पूर्व ५४४-४९६) हा प्राचीन चीनमधील , पूर्व आशियातील एक मोठा लष्करप्रमुख आणि एक ऐतिहासिक असा युद्धतज्ज्ञ होऊन गेला. युद्धकला हे त्याचे अतिशय मूलगामी, अभिजात, सार्वकालिक लेखन असून, हे लेखन पौर्वात्य साहित्याचा एक मौल्यवान घटक आहे. लष्करी व्यूहरचना आणि युद्ध या विषयावरचे त्याचे विचार या पुस्तकात नमूद झाले आहेत. अनेक मोठ मोठे लष्कर प्रमुख, उदा. नेपोलियन, माओ, फिडल कॅस्ट्रो, जोसेफ स्टॅलिन आणि जनरल डगलस मॅकऑर्थर या थोर युद्ध सेनानीनी आपल्या युद्धात युद्धकला या ग्रंथात सांगितलेल्या तंत्राचा व युद्ध कौशल्यचा वापर केला आणि आपल्या लढाया जिंकल्या. चिनी सम्राट आणि नंतरच्या शासकांनी युद्ध काळात या पुस्तकाचा आधार घेतला. एकूण तेरा प्रकरणात विभागले गेलेले युद्धकला हे पुस्तक नानाविध मुद्यांच्या आधारे समग्र युद्धाच्या अनेक घटकांवर प्रकाश टाकते. उदाहरणार्थ लष्करी मोर्चे कसे सांभाळावेत, गुप्तहेरांचा उपयोग कसा करुन घ्यावा, पराभूत होणाऱ्या सैनिकांना कसे वागवावे तसेच इतर देशांशी (राजनीती) संबंध कसे जोडावेत, मोठ्या युद्धात छोट्या छोट्या लढाया कशा टाळाव्यात, या सर्व बाबींवरचे चिंतन या पुस्तकात आहे. प्राचीन काळातले मौल्यवान असे हे युद्धसाहित्य आजही तितकेच मोलाचे व उपयुक्त आहे.

