नकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
राग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का?
असं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल:
लोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.)
नकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे?
आपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल?
सोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.)