Payal Books
The Archer (Marathi) Author : Paulo Coelho (author) Dr. Shuchita Phadke (translator)
Couldn't load pickup availability
द अल्केमिस्ट या पुस्तकाच्या नंबर वन बेस्टसेलिंग लेखकाच्या या प्रेरक कथेमध्ये एक युवक एका वृद्धाकडून शहाणपणाच्या गोष्टी आणि व्यावहारिक धडे शिकतो.
या पुस्तकात आपण तेत्सुयाला भेटतो. तेत्सुया, एके काळी धनुर्विद्येमध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेसाठी प्रसिद्ध होते परंतु आता सार्वजनिक जीवनातून ते निवृत्त झाले आहेत. एक मुलगा त्यांना शोधत येतो. त्याच्या मनात कित्येक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं देताना तेत्सुया धनुष्याची कार्यपद्धती सांगतात आणि अर्थपूर्ण जीवनाचे सिद्धान्त प्रकट करतात. पाउलो कोएलो यांची ही कथा स्पष्ट करते की, कर्म आणि आत्मा यांच्या मिलाफाशिवाय जगण्याचं समाधान मिळत नाही आणि नाकारले जाण्याच्या किंवा अपयशाच्या भीतीमुळे संकुचित जीवन जगणं योग्य ठरत नाही. याऐवजी मनुष्याने जोखीम उचलली पाहिजे, धाडसी बनलं पाहिजे आणि जीवनाच्या अनपेक्षित यात्रेसाठी तयार राहायला पाहिजे.
बुद्धिमत्ता, औदार्य, साधेपणा आणि विनयशीलता या ज्या गुणांनी कोएलो यांना आंतरराष्ट्रीय बेस्टसेलिंग लेखक बनवलं, त्या आधारेच त्यांनी यशस्वी जीवनाची रूपरेषा प्रस्तुत केली आहे : कठोर परिश्रम, उत्साह, उद्देश, विचारसरणी, अपयशाचा स्वीकार आणि जगामध्ये बदल घडवून आणण्याची इच्छा.
