The 4-Hour Work Week (Marathi) by Timothy Ferriss
नवीन असांकेतिक आयुष्याचा मार्ग शोधण्याची जर तुमच्याकडे तीव्रतम इच्छा असेल, तर तुम्ही हे पुस्तक वाचलेच पाहिजे. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत आणि भविष्याची तरतदू करण्याची संकल्पना ही जुनाट होत आहे, हे तुमच्या कधी लक्षात येते आहे का? तुम्ही या जुनाट संकल्पना टाकून नव्याने विचार करायला हवा! या भयानक अशा स्पर्धात्मक जगापासून निसटून जाण्याचे प्रयत्न तुम्ही करीत आहात आणि त्यासाठी भली मोठी स्वप्ने तुम्ही बघता! तुम्हाला जगभरचा प्रवास करायचा असतो. तुम्हाला पाच आकडी उत्पन्न हवे असते. कुठल्याही व्यवस्थापनाशिवाय तुमचे अर्थार्जन झाले पाहिजे. तुम्ही कमी श्रम आणि जास्त मोबदला मिळवला पाहिजे. यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पुस्तक तुम्हाला स्वप्ने कशी पहावी आणि आयुष्य कसे जगावे, या विषयी मार्गदर्शन करेल. या पुस्तकाचे लेखक टीमोथी फेरीस यांचे उत्पन्न चाळीस हजार डॉलर्स प्रति वर्षापासून चाळीस हजार डॉलर्स एका महिन्यात कसे कमवावे ते हे पुस्तक सांगते. तुम्ही तुमच्या आयुष्यात एक मोठे करीअर करू शकता तेही अतिशय छोटी छोटी कामे करून आणि मध्ये छोटी छोटी निवृत्त करून हे साधता येईल. तुमच्या आयुष्याला नवीन स्त्रोत कसे पुरवावेत व जे तुम्हाला अपेक्षित आहे, ते कसे मिळवावे याबद्दलचे मार्गदर्शन यात आहे.