Payal Books
Thang athangachaथांग. अथांगाचा अरुण नेरूरकर
Couldn't load pickup availability
धोग अधोगाचा
समुद्र या एका प्रतिकातून जगण्याविषयी बोलणं तसं कठीणच आहे. पण अरुण नेरुरकर अथांग समुद्राच्या तळाशी जाऊन त्याचा थांग घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना भावलेला, समजलेला आणि त्यांनी अनुभवलेला वेगवेगळ्या ठिकाणचा समुद्र ते या पुस्तकात उलगडतातच, पण त्यासोबत या समुद्राला कवेत घेणाऱ्या, त्याच्याशी असलेलं मैत्र जपणाऱ्या आणि त्याच्या लाटांवर स्वार होऊन जगलेल्या या वेगवेगळ्या कलंदरांची कहाणीही सांगतात.
अशा कलंदरांवर कादंबरी लिहिणारे मेलविल, हेमिंग्वे, आणि अनंत सामंत यांच्यासारख्या कादंबरीकारांच्या कादंबऱ्यांनी झपाटलेले अरुण नेरूरकर या कादंबऱ्यांतला समुद्र आणि त्यातलं जगणं आपल्याला उलगडून दाखवतात. मॉबी डिक, दि ओल्ड मॅन अँड द सी आणि एम टी. आयवा मारू या तीन कादंबऱ्यांसोबत दि राईम ऑफ दि एन्शिअन्ट मरिनर ही कोलरीज यांची कविता यांनी ते प्रभावित झालेले आहेत. याबरोबरच अनेक लेखक, कवींच्या लेखनातून येणारा समुद्र त्यांना आकर्षित करतो. त्याविषयी ते आवर्जून आपली मतं मांडतात.
खरं तर समुद्र हा पोटात वडवानल घेऊन वावरत असतो. त्याच्या खोल तळाशी अनेक उद्ध्वस्त आयुष्यं असतात. ती तो पाहत असतो. अशा समुद्रापर्यंत पोहोचून त्याला जाणून घेतलं तर बाहेरचं भयाण वास्तव कळायला लागतं. नेरूरकरांना त्याची जाणीव आहे.
या पुस्तकातील विविध लेखांत ते या समुद्रालाच कवेत घेऊ पाहतात. समुद्राशी असलेलं त्यांचं मैत्र त्यांना त्याच्या खोल तळापर्यंत घेऊन जातं. *हे पुस्तक म्हणजे या समुद्राच्या विविध छटांना कवेत घेऊन त्याच्याशी साधलेला संवाद आहे. -नीरजा
