{"product_id":"teneh-hyancha-vangmaysiddhant-by-suresh-dhaygude","title":"Teneh Hyancha Vangmaysiddhant By Suresh Dhaygude","description":"\u003cspan\u003eप्रो . तेन यांनी आपला ‘ वाङ्मयसिद्धान्त ‘ फ्रेंचमध्ये १८६४ मध्ये मांडला . त्याचे १८६१ मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले . गेली एकशेपन्नासाधिक वर्षे जगभरचे अभ्यासक या सिद्धान्ताची सातत्याने चर्चाचिकित्सा करीत आलेले आढळतात . विशेषत : ‘ वंश ‘ ( Race ) , ‘ वातावरण ‘ ( Milieu ) व ‘ वेला ‘ ( Moment ) ही तेनची तत्त्वत्रयी अभ्यासकांना निरनिराळ्या प्रकारांनी विचार करायला लावणारी आहे . या त्रयीखेरीज तेन यांनी इतरही महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत . महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ‘ राष्ट्र व राष्ट्रीयते’चाही सुदीर्घ विचार केलेला आहे . आज भारतात आणि विशेषत : महाराष्ट्रात वाङ्मयाच्या सामाजिक अभ्यासाने जोर धरलेला आहे . दलित , ग्रामीण , भटके , आदिवासी , गिरिजन साहित्यकृतींनी वाङ्मयाच्या सामजिक समीक्षेची गरज अधोरेखित केलेली आहे . याशिवाय सध्या आपण ‘ भारतीय वाङ्मया’च्या संकल्पनेचाही गंभीरपणाने विचार करीत आहोत . त्यामुळे तेनच्या सिद्धान्ताचे नव्याने अवलोकन होणे गरजेचे झालेले आहे . प्रस्तुत पुस्तकाद्वारे तेनच्या सिद्धान्ताचे यथामूल व सुविहित भाषांतर प्रथमच मराठीत येत आहे . मराठीबरोबर हिंदी व इंग्रजीच्या अभ्यासकांनादेखील हे भाषांतर उपयोगाचे ठरेल .\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":42582636363969,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/HIH_d39c6289-c3f9-4656-b868-3519b888ab4a.gif?v=1682686109","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/teneh-hyancha-vangmaysiddhant-by-suresh-dhaygude","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}