१६ व्या शतकातील तेनाली रामकृष्णन् म्हणजेच तेनालीराम अनेक शतकांपासून मुलांचा मित्र आहे. आंध्र प्रदेशातील तेनाली जिल्हयात जन्मलेले रामकृष्णन् म्हणून त्यांचे तेनालीराम असे नामकरण करण्यात आले. बुद्धिमत्ता, चातुर्य समयसूचकता आणि विनोदीशैली या वैशिष्ट्यांमुळे कृष्णदेवराय महाराजांच्या दरबारात त्यांना नवरत्नांपैकी एक म्हणून स्थान मिळाले. राज्यावर कोणतेही संकट आले, तरी ते त्यावर त्वरित उपाय सांगत. त्यांचे चातुर्य आणि बुद्धिमत्तेमुळे ते दरबारात ईर्षेचे मुख्य लक्ष्यही बनत; पण महाराजांच्या नजरेत त्यांचे स्थान हे कायम महत्त्वाचे आणि जवळचे होते.
तेनालीरामच्या १६ व्या शतकातल्या गोष्टी आजही मुलांना सांगितल्या जातात. त्यांच्या गोष्टीतील चातुर्य, बुद्धिमत्ता, समयसूचकता मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरतात. छोट्या-छोट्या घटनांतून मोठ-मोठे संदेश आणि शिकवण देणाऱ्या या गोष्टी आहेत. बुद्धीला चालना देणाऱ्या तेनालीरामच्या या १६ गोष्टी प्रकाशित करीत आहोत.
Payal Books
Tenaliramchya Goshti | तेनालीरामच्या गोष्टी by AUTHOR :- Rajesh Gupta
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
