Payal Books
Tears Of The Giraffe By Alexander Mccall Smith Translated By Neela Chandorkar
Regular price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 198.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघाती मृत्यूसंबंधीची केस–प्रेश्यसच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीतील सर्वांत कठीण, गुंतागुंतीची केस... एक विशीतला अमेरिकन तरुण बोट्स्वानातून अचानक, काहीही मागमूस न ठेवता नाहीसा होतो. सर्व प्रकारे शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नाही. हे समजल्यानंतर पोलीस ती केस कायमची बंद करून टाकतात. प्रेश्यस ती का आणि कशी उलगडते हे वाचूनच पाहायला हवं... व्यावसायिक आघाडीवर यशस्वीपणे, दमदारपणे पुढे जात असताना तिच्या वैयक्तिक जीवनातही काही खळबळजनक घटना घडत असतात... नव्या जबाबदा-या अनपेक्षितपणे अंगावर कोसळत असतात. अर्थात, तिच्या मदतीसाठी दोन हक्काचे हात, नव्हे जीवनभराची साथ तिला लाभणार असते, ती जे. एल. बी. मातेकोनींच्या रूपात... व्यवसायानं मेकॅनिक ! त्यांचा नेहमी संबंध येतो तो निर्जीव गाड्यांशी, त्यातील यंत्रभागांशी, इंजिनांशी! ...पण प्रेश्यसमध्ये आणि त्यांच्यात एक मोठं साम्य असते. दोघांच्या हृदयात माणुसकीचा ओलावा आहे... त्यामुळेच कधीकधी ते गोत्यातही येत असतात. प्रेश्यसची व्यावसायिक वाटचाल वाचकांना कधी हसवते, कधी अंतर्मुख करते, तर काही वेळा वाचकांची मनं हेलावून सोडते. गुंतागुंतीच्या केसेसचा उलगडा नेहमीच २±२·४ या पद्धतीनं करता येत नाही. त्यासाठी वेगळ्या अंगानं विचार करावा लागतो. `सापभी मरे और लाठीभी ना टूटे...` अशी हुशारी प्रेश्यस वापरते, तेव्हा तिच्यातील नैतिक सामथ्र्याची, तिच्यावर केल्या गेलेल्या संस्कारांची मनापासून दाद द्यावीशी वाटते. शीर्षकापासूनच या पुस्तकाचं वेगळेपण जाणवतं... ही गोष्ट आहे त्या वेगळ्या स्त्रीची, जिच्यात क्वचित प्रसंगी तुम्हाला तुमचं प्रतिबिंबही दिसेल...
![Tears Of The Giraffe By Alexander Mccall Smith Translated By Neela Chandorkar](http://payalbooks.com/cdn/shop/products/Tears-Of-The-Giraffe-FC_1445x.jpg?v=1652847400)