PAYAL BOOKS
Te Don Manore (The Lord of the Rings-Part-2) By J R R Tolkien, Mugdha Karnik(Translators) (ते दोन मनोरे)
Couldn't load pickup availability
Te Don Manore (The Lord of the Rings-Part-2) By J R R Tolkien, Mugdha Karnik(Translators) (ते दोन मनोरे)
जे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘ते दोन मनोरे’ हा दुसरा भाग आहे.
कृष्णशक्तीचा साथीदार सॉरॉनच्या हाती सर्वशक्तिमान मुद्रिका पडू नये म्हणून ती अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्नीरसाच्या दरीत नष्ट करण्याच्या कामगिरीवर फ्रोडो आणि मुद्रिकेचे साथीदार निघाले आहेत. वाटेत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मोरियाच्या खाणीत एका दुष्टात्म्याशी लढा देताना त्यांना जादूगार गॅन्डाल्फला गमावावं लागतं. रौरॉसच्या धबधब्यापाशी मुद्रिकेच्या शक्तीच्या मोहात पडून बोरोमीर ती बळाने काबीज करण्याचा प्रयत्न करतो. इतर साथीदारांवर ऑर्क्सचा हमला झाला असतानाच फ्रोडो आणि सॅम तिथून वेगळ्या मार्गाने प्रवास सुरू करतात.
आता महानदी अँड्युइनच्या काठाने एकटा प्रवास करत असताना एक गुढ व्यक्ती त्यांचा सतत पाठलाग करत आहे.


